Pune Crime News | जेवणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून डोक्यात फरशी मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Pune Pimpri Chinchwad Crime News | An attempt was made to kill a young man by hitting him with a stone for asking him to answer for the beating of his friend's brother

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | दारु पिल्यानंतर जेवणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून डोक्यात फरशी मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत मृत्युंजय शंकर सिंग (वय ३९, रा. भिडे पुलाजवळील बी पी कन्स्ट्रक्शन या बांधकाम साईटवरील पत्र्याच्या खोलीमध्ये, नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आश्विन यादव याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार भिडे पुलाकडे जाणार्‍या रस्त्यावरील पत्र्याच्या खोलीमध्ये बुधवारी रात्री पावणेदहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे झारखंड येथील राहणारे असून गेल्या ६ महिन्यांपासून भिडे पुलाजवळील गफूर पठाण यांचे बी पी कन्स्ट्रकशन यांचे बांधकाम होत असलेल्या इमारतीमध्ये ठेकेदार अप्पा कांबळे याच्यामार्फत बांधकाम मजूर म्हणून सेट्रिंगचे काम करत आहेत. तेथे तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या पत्र्याचे खोलीत राहत आहे. त्यांच्या बाजूच्या खोलीत संदीप कुमार व त्यांचा सहकारी आश्विन यादव हे रहातात. बुधवारी रात्री पावणे दहा वाजता संदिप कुमार व आश्विन यादव यांच्या खोलीतून भांडणाचा आवाज येत असल्याने फिर्यादी हे तेथे काय झाले ते पाहण्यासाठी गेले. तेव्हा संदीप कुमार व आश्विन यादव हे दोघे दारु पित बसले होते. त्यांच्यामध्ये जेवणावरुन आपसात भांडण सुरु होते.

आश्विन यादव हा संदीपकुमार याला शिवीगाळ करुन तेरा बहोत हो गया नाटक, तुझे आज छोडेगा नही, तेरा खेल आज खतम कर देता, अशी म्हणून धमकी देत होता. त्यावेळी फिर्यादी व राहुल सोनकांबळे यांनी त्यांचे भांडण सोडविले. त्यानंतर संदीपकुमार रुममधून बाहेर पडून बांधकाम साईटच्या खाली भिडे पुलाकडे निघाला. त्यावेळी आश्विन यादव हा देखील संदीप कुमार याच्या मागे धावत गेला. त्याने वाटेत पडलेली फरशी हातात घेऊन जादा बोलता है आज तेरा खेल खतम असे म्हणून संदीप कुमार याच्या डोक्यात मागून हातातील फरशी जोरात मारली. या आघाताने संदीपकुमार खाली पडला. तेव्हा आश्विन याने पुन्हा फरशी डोक्यात मारली. तेथून तो पळून गेला. फिर्यादी व इतरांनी संदीपकुमार याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराड तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)