Pune Crime News | मोफत धान्याची लालुच दाखवून ज्येष्ठ महिलेला लुबाडले

पुणे : Pune Crime News | आमचे साहेब गरीबांना धान्य, कपडे वाटप करीत असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिक महिलांना लक्ष्य करुन त्यांना लुबाडण्याच्या घटना पुन्हा सुरु झाल्या आहेत. हडपसर येथील कॅनॉलशेजारील बोळीमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजता चोरट्यांनी एका महिलेला लक्ष्य करुन १ लाख १४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. (Pune Crime News)

याप्रकरणी एका ७६ वर्षाच्या महिलने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु.रजि. नं. ३५६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा चोरट्यांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

फिर्यादी या कॅनॉलशेजारी आयसीआयसीआय बँकेजवळ असताना तिघे जण त्यांच्याजवळ आले.
माझ्यासोबत चला, आमचा साहेब म्हातार्‍या माणसांना धान्य वाटप करणार आहे व गोर गरीबांना पैसे पण
देणार आहे, असे सांगून त्यांना बँकेच्या इमारतीच्या डाव्या बाजूला एका बोळीमध्ये घेऊन गेले.
त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या गळ्यातील १ लाख १४ हजार रुपयांचे ४७ ग्रॅम वजनाचे दागिने काढून घेतले
व ते पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | An elderly woman was robbed by showing the greed of free grains

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane Crime News | ठाण्यात शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांची फेरीवाल्याकडून हत्या; फेरीवाल्यांच्या वादातून केली हत्या

MPSC Result | एमपीएससीचा निकाल जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला

Pune Crime News | रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा फ्लेक्स लावणार्‍यांवर गुन्हा दाखल; महापालिकेची कारवाई

Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या 9 आयपीएस अधिकाऱ्यांची पदस्थापना, 3 अधिकाऱ्यांच्या बदल्या