Pune Crime News | माथाडीच्या नावाने खंडणी मागणार्या रवी ससाणे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | माथाडीच्या नावाने व्यावसायिकांची अडवणूक करुन त्यांच्याकडून खंडणी (Extortion Case) वसुल करणार्या रवी ससाणे (Ravi Sasane) याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिनिक्स मॉलमध्ये (Phoenix Mall, Vimannagar) कामासाठी सामान घेऊन येणार्या व्यावसायिकांकडे तो सातत्याने खंडणी (Ransom Case) उकळत आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी पूनावळे येथील एका ३३ वर्षाच्या व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रवींद्र ऊर्फ रवि जयप्रकाश ससाणे Ravindra alias Ravi Jayaprakash Sasane (रा. चंदननगर) आणि त्याचा साथीदार मंगल सातपुते याच्यावर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. हा प्रकार विमाननगर येथील फिनीक्स मॉलमध्ये ६ डिसेबर २०२२ पासून ३१ जानेवारी २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी ससाणे हा फिनिक्स मॉलमध्ये माल घेऊन येणार्या व्यावसायिकांची अडवणूक करुन त्यांना तुमचा माल खाली करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे सांगून धमकावुन त्यांच्याकडून लाखो रुपये वसुल करीत आला आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून त्यांचा हा राजरोज धंदा झाला आहे. फिनिक्स मॉलमधील व्यावसायिकांकडून हप्ता घेतल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ससाणे याला चार वर्षापूर्वी फेब्रुवारी २०१९ मध्ये अटक केली होती. त्याच्याअगोदरही त्याने असेच गुन्हे केले आहेत. जामीनावर सुटल्यावर तो पुन्हा माथाडींच्या नावाने व्यावसायिकांकडून खंडणी वसुल करीत होता. परंतु, आतापर्यंत पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. (Pune Crime News)
एका व्यावसायिकाला फ्लोअरींगचे फरशी बसविण्याचे काम मिळाले होते. त्यासाठी कोची येथून फरशा घेऊन आलेला ट्रक ससाणे व त्याच्या साथीदारांनी अडवला. फरशा खाली करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्याकडून १ लाख २४ हजार रुपये घेतले होते. विमानतळ पोलिसांना या व्यावसायिकाने २९ नोव्हेबरला तक्रार अर्ज दिला होता. त्याची आतापर्यंत दखल घेतली गेली नव्हती. गेल्या आठवड्यात पुन्हा असा प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
पुनावळे येथील व्यवसायिक फिनीक्स मॉलमधील एका कंपनीचे अंतर्गत नुतनीकरणाचे काम करत होता.
त्या कामासाठी पिंपरी येथून प्लायवूडचा भरलेला ट्रक ६ डिसेबर २०२२ रोजी फिनिक्स मॉलमध्ये आला होता.
त्यावेळी ससाणे व त्याच्या साथीदारांनी हा ट्रक खाली करुन न देता अडवून ८ लाख रुपयांची खंडणी मागितली.
तडजोडीअंती साडेचार लाखांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून चेकद्वारे २ लाख रुपये घेतले.
उर्वरीत अडीच लाख रुपये देण्यासाठी तो सातत्याने फिर्यादीला भेटून तसेच फोन करुन पैसे दिले नाही तर
जीवे मारण्याची धमकी देत होता. ससाणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर फिर्यादी
यांनी पोलिसांकडे धाव घेतले. या तक्रारीही दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सूचना दिल्या़ त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title :-Pune Crime News | Another case filed against Ravi Sasane who demanded extortion in the name of Mathadi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sania Mirza | सानिया मिर्झाचा अबु धाबी ओपनमध्ये पराभव; पहिल्याच फेरीत पडली बाहेर