Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

0
319
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested
File Photo

पुणे : Pune Crime News | जेवायला दिले नाही आणि स्वत: दारु पिली या कारणावरुन एका रिक्षाचालकाने आपल्या दुसर्‍या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन तिचा खून (Murder in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Pune Police) परशुराम उदडंप्पा जोगन (वय ३८, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक (Arrest) केली आहे. सविता संदिप औचिते (वय ३२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

याप्रकरणी गणेश दत्तात्रय शिंदे (वय ३३, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६/२३) दिली आहे. हा प्रकार अप्पर इंदिरानगरमध्ये सोमवारी पहाटे २ वाजता घडला होता. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम जोगन हा रिक्षाचालक आहे. सविता औचिते ही त्याची दुसरी पत्नी आहे. परशुराम यांच्या दारुच्या व्यसनामुळे काही वर्षांपूर्वी त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली. तेव्हापासून परशुराम एकटाच होता. सविता औचिते ही मुळची उल्हासनगर येथील राहणारी असून ती पुण्यात मिळेल ते काम करुन रहात असे. तिची आणि परशुराम यांची ओळख झाली. त्यानंतर गेल्या १५ दिवसांपूर्वी ते अप्पर इंदिरानगर येथे भाड्याने जागा घेऊन राहू लागले.

परशुराम जोगन हा गणेश शिंदे यांच्या रिक्षावर चालक म्हणून काम करीत होता. रविवारी रात्री उशिरा तो दारु पिऊन घरी गेला. तेव्हा त्यांची पत्नी सविता हिनेही दारु पिली होती. त्याने जेवायला वाढ असे सांगितले.
त्यानंतरही तिने जेवायला न दिल्याच्या रागात त्याने सविता हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात ती निपचित पडली.
ती काही बोलत नाही. हलत नाही हे पाहिल्यावर परशुराम याने रिक्षामालक शिंदे यांना फोन करुन हे सांगितले.
त्यानंतर त्यांनी तेथे येऊन पाहिले असता सविता हिचा मृत्यु झाला होता. त्यांनी बिबवेवाडी पोलिसांना कळविले.
पोलिसांनी परशुराम जोगन याला अटक केली असून पोलीस निरीक्षक हिवरकर अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked
to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा