Pune Crime News | लष्कराच्या परीक्षेत बनावट उमेदवाराला बसविणार्‍यास अटक

पुणे : Pune Crime News | लष्कराच्या एमएस डब्ल्यु ग्रुप सी कुक (Army MSW Group C Cook) या पदाकरीता लेखी परीक्षेमध्ये आपल्या जागेवर दुसर्‍या उमेदवाराला बसवून फसवणुक (Cheating Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी राहुल मेंहेंद्रसिंह राठी Rahul Mehendra Singh Rathi (वय ४२) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८५/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिपु कुमार Deepu Kumar (वय २३, रा. बिहार) आणि शैलेंद्रसिंग Shailendra Singh (वय २४, रा. उत्तरप्रदेश) यांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार धानोरी येथील भैरवनगरमधील ग्रीफ बॉर्डर रोड ऑरगनायजेशन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (Grief Border Road Organization Ministry of Defence) येथे मंगळवारी सकाळी ९ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवनगर येथील ग्रीफ बॉर्ड रोड ऑरगनायजेशन येथे
एम एस डब्ल्यु ग्रुप सी कुक या पदाकरीता लेखी परीक्षा होती. त्यासाठी शैलेंद्रसिंग याच्या जागेवर दिपु कुमार
हा बसून परीक्षा देत असल्याचे लक्षात आले. हे लक्षात आल्यावर परीक्षकांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत़.

Web Title :- Pune Crime News | Arrested for making fake candidate appear in army exam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Minister Sanjay Rathod |औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

Beed Accident News | काळाने केला घात! परीक्षेला जाताना वाहनाने दिलेल्या धडकेत बाईकस्वार तरुणाचा मृत्यू