Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्यास अटक, 8 लाखाचे अंमली पदार्थ जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला (Ganja Selling Rakect) गुन्हे शाखेच्या (Pune City Police) अंमली पदार्थ विरोधी (Anti Narcotic Cell) पथकाने कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd) परिसरातुन ताब्यात घेतले. त्याच्याकडील तब्बल 40 किलो 245 ग्रॅम गांजा आणि इतर ऐवज असा एकुण 8 लाख 64 हजार 900 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

व्यंकट मनोहर सुर्यवंशी (40, रा. चक्रपाणी वस्ती, गल्ली नं. 3, भोसरी, पुणे. मुळे रा. मु.पो. उमापुर, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक – 1 मधील पोलिस अधिकारी व अंमलदार हे कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी विशाल दळवी यांना आरोपीबाबत महिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आल्यानंतर व्यंकट सुर्यवंशीला सापळा रचुन अटक करण्यात आली. (Pune Crime News)

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून कमर्शियल कॉन्टेटी असणारा 40 किलो 245 ग्रॅम गांजा आणि इतर ऐवज असा एकुण 8 लाख 64 हजार 900 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik),
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Ramnat Pokale) , पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad), सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर
(API Shailaja Jankar) , पोलिस अंमलदार विशाल दळवी, पांडुरंग पवार, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके,
मारूती पारधी, प्रविण उत्तेकर, सचिन माळवे, राहुल जोशी, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख आणि
योगेश माहिते यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

Web Title :- Pune Crime News | Arrested for selling ganja, drugs worth 8 lakh seized

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gulabrao Patil | ‘तेच ते बोलून आम्हाला छळण्यापेक्षा नव्याने पक्ष बांधणी करा’, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सल्ला

TDM Marathi Movie | जब जिंदगी झंड होती है, तो पुना, बंबईही याद आती है…! ‘टीडीएम’चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज (Video)

Maharashtra Politics News | ‘राष्ट्रहितासाठी राष्ट्रवादी भाजपसोबत येत असेल तर…’, भाजप मंत्र्यांचं मोठ विधान