Pune Crime News | पैशांच्या देवाण-घेवाणीतून गॅरेज चालकावर हल्ला, घोरपडे पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पैशांच्या देवाण-घेवाणीतून एका गॅरेज चालकावर हल्ला करुन फायटरने मारहाण (Beating) करत गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील घोरपडे पेठेत (Ghorpade Pethe) घडली आहे. याप्रकरणी एकावर खडक पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.1) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मारुती मोटार गॅरेज येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत संदीप मारुती पवार Sandeep Maruti Pawar (रा. घोरपडे पेठ, शंकरशेट रोड, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकाश गजानन साळुंखे Akash Gajanan Salunkhe (रा. शिवदर्शन, वेताळबाबा मंदिराच्या मागे, लक्ष्मीनगर, पुणे) याच्यावर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी संदिप पवार यांचे घोरपडे पेठेत मारुती मोटार नावाचे गॅरेज आहे. पवार हे त्यांच्या गॅरेजमध्ये काम करत असताना आरोपी आकाश साळुंखे तिथे आला. मी तुला टीव्ही घेण्यासाठी व गॅरेजसाठी 40 हजार रुपये दिले होते. ते तु मला अद्याप दिले नाहीस. ते मला दे असे म्हणत फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला. त्यावेळी फिर्यादी यांनी मी तुला पैसे दिले आहेत आता तुला कसले पैसे देवू असे म्हणाले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच पँन्टच्या खिशातून लोखंडी फायटर काढून संदिप पवार यांच्या डाव्या डोळ्यावर मारुन गंभीर दुखापत केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लग्नाचे आमिष दाखवून आत्येभावाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हडपसर परिसरातील घटना

बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यातील बँकेची 21 लाखांची फसवणूक

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड