पुणे/नारायणगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कौटुंबिक वादातुन भाच्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मामाचा नाकाला लावलेला ऑक्सिजन मास्क (Oxygen mask) काढून त्यांच्या नाका-तोंडावर टॉवेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. याप्रकरणी खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश (District and Additional Sessions Judge) यांनी आरोपीला दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावास (Rigorous Imprisonment) व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे (Narayangaon Police Station) सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार (API Mahadev Shelar) यांनी दिली. (Pune Crime News)
नारायणगाव येथील डॉ. मनू मेहता हॉस्पिटलमध्ये (Dr.Manu Mehta Hospital) पुरुषोत्तम मधुकर कुलकर्णी Purushottam Madhukar Kulkarni (रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) हे 9 मे 2012 रोजी पहाटे विषबाधा झाल्याने आयसीयूमध्ये उपचार घेत होते. फिर्यादी विशाल विजय कुलकर्णी Vishal Vijay Kulkarni (रा. बोटा, ता. संगमनेर) याचा मावसभाऊ आरोपी विठ्ठल एकनाथ असलेकर Accused Vitthal Eknath Asekar (रा. जांबूत, ता. शिरुर) याचे आई-वडिलांसोबत झालेले भांडण मामा पुरुषोत्तम याने मिटवले नाही याचा राग त्याच्या मनात होता. याच रागातून आरोपीने उपचारासाठी नाकाला लावलेला ऑक्सिजनचा मास्क काढून नाक-तोंडावर टॉवेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime News)
या गुन्ह्यात आरोपीला दोषी ठरवून न्यायाधीश ए.एस. सय्यद (Judge A.S. Sayyad) यांनी भादंवि कलम 307 अन्वये दोन वर्ष सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तसेच कलम 328 अन्वये एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आवताडे (API Awatade) यांनी केला होता.
गुन्ह्यात सरकारी वकील देशमुख व रासकर यांनी काम पाहिले.
तसेच गुन्ह्याचे कोर्टाचे कामकाज नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शेलार
(API Shelar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल वाय. डी. गारगोटे यांनी काम पाहिले.
तसेच जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे (API Prithviraj Tate)
यांनी व खेड कोर्ट पैरवी अधिकारी सहायक फौजदार खरात यांनी काम पाहिले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Maratha Reservation Protest | “रिक्षाभर पुरावे आम्ही सरकारला देण्यास तयार…” मनोज जरांगे यांचा दावा