Pune Crime News | दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याकडून तरुणावर जीव घेणा हल्ला

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – दोन गटातील वादातून स्वारगेट परिसरात टोळक्याने तरुणावर जीवे घेणा हल्ला करत त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांना अटक केली आहे.

याप्रकरणी सुलतान करीम शेख व अश्पाक मुन्ना शेख या दोघांना अटक केली आहे. तर हसन उर्फ अच्यु रमजान शेख व आलम शेख या दोघावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सौरभ मारुती कसबे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशपाक व सुलतान हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दरम्यान सर्व एकाच परिसरातील आहेत. दोन गटात वाद आहेत.

तर दोन दिवसांपूर्वी रात्री फिर्यादी तरुण हा इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील वाडेकर हॉस्पिटल समोरून जात होता. यावेळी आरोपींनी त्याला पाहिले आणि हा त्यांचे वाद सुरू असणाऱ्या तरुणांसोबत राहत असल्याच्या कारणावरून त्याला शिवीगाळ केली.

“हा सुद्धा त्यांच्यातच असतो, याचाही आपण काटा काढू” अशी धमकी देत फिर्यादीच्या दिशेने दगड मारला. हा दगड फिर्यादीच्या नाक आणि डोळे याच्या वर लागला असून फिर्यादी जखमी झाला आहे. तर लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा

ESIC Covid-19 Relief Scheme | कोरोना मृतांच्या अवलंबिताना मिळणार किमान 1800 रुपये मासिक पेन्शन, कामगार मंत्रालयाने नोटिफाय केली स्कीम

PM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास 4,000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या कसे

Gold Rate Today | खुशखबर ! सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; सोने 2152 आणि चांदी 4647 रूपयांनी ‘स्वस्त’

Coronavirus Vaccine Free | उद्यापासून सर्वांसाठी मोफत कोरोना व्हॅक्सीन, CoWin वर अगोदर रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही

सरकारनं दिला इशारा ! नोकरीसाठी मिळाली असेल ऑफर तर व्हा सावध, होऊ शकतं मोठं नुकसान; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | attempt to murder in swargate area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update