Pune Crime News | व्यावसायिक वादातून इस्टेट एजंटवर वार करुन खूनाचा प्रयत्न; कोंढव्याच्या हद्दीतील टिळेकरनगर येथील घटना

0
840
Pune Crime News | Attempted murder by stabbing an estate agent over a business dispute; The incident at Tilekarnagar in the Kondhwa area
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुंबईतील एका बंगल्याच्या व्यवहारातील पैसे परत करण्याच्या वादातून एका इस्टेट एजंटने (Estate agent) दुसर्‍याच्या डोक्यात, गालावर धारदार शस्त्राने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. (Pune Crime News)

 

लॅन्सी अ‍ॅन्थनी दास (वय ५२, रा. दापोडी) असे गंभीर जखमी झालेल्या इस्टेट एजेंटचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) संदीप विठ्ठल खोपडे (रा. कात्रज) याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना टिळेकरनगर येथे ११ मार्च रोजी रात्री ९ वाजता घडली. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लॅन्सी आणि संदीप खोपडे हे दोघेही इस्टेट एजंट आहेत. फिर्यादी व त्यांचा मित्र लेनी जॉन यांनी मुंबई येथील एका बंगल्याचे व्यवहार करीत होते.त्या कामात खोपडे याने पैसे गुंतविले होते. हा बंगला पडिक असल्याचे त्याच्या व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या.
त्या व्यवहारातील १ लाख रुपये परत देण्यासाठी खोपडे लॅन्सीच्या मागे लागला होता. लॅन्सी याने आपल्याकडे इतके पैसे नसल्याचे सांगितले.
त्यासाठी खोपडे याने ११ मार्च रोजी त्याला बैठकीसाठी टिळेकरनगरमध्ये बोलविले होते.
तेथे त्यांच्यावर धारदार हत्याराने गालावर, डोक्यात वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारात लॅन्सी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असतानाही पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
आता तब्बल ७ दिवसांनी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Attempted murder by stabbing an estate agent over a business dispute; The incident at Tilekarnagar in the Kondhwa area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले

Pune Crime News | मेफेड्रोन, चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त