Pune Crime News | जुन्या कात्रज घाट रोडवरील हॉटेल तोरणाजवळ युवकाच्या खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तुला लय माज आला आहे ना, लोकांना टपल्या मारून हसायला लय मजा येते असुन म्हणुन युवकावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जुन्या कात्रज घाट रोडवरील हॉटेल तोरणाजवळ (Hotel Torna Katraj) घडली आहे. याप्रकरणी चौघांविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल (Attempt To Murder) करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी विशाल विठ्ठल खुळे Vishal Vittal Khule (18, रा. लेन नंबर 3, जय शंकर अपार्टमेंट, जुनी पाण्याची टाकी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार आरोपी ओंकार पवार (Omkar Pawar), यश बोरकर (Yash Borkar), गणेश दोडमणी Ganesh Dodmani (सर्व रा. कात्रज) आणि इतर एकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक महिती अशी की, दि. 29 मार्च रोजी दिवसभर मार्केटयार्डवरून काम करून आपल्यानंतर फिर्यादी आणि त्यांचा मित्र शुभम परदेशी, कमलेश लोखंडे, तन्मय शिंदे हे कात्रज तळयाजवळील फाटे आळी येथील चौकाजवळील शिवशंकर मंडळ येथे गप्पा मारत थांबले होते. गप्पा मारून झाल्यानंतर फिर्यादी साधारण रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी जात होते. ते तोरणा हॉटेल येथे आले असता त्यांना ओंकार पवार, यश बोरकर, गणेश दोडमणी आणि इतर एक जण त्यांना दिसले. त्यापैकी यश बोरकरने त्यांना हाक मारून बोलावले. (Pune Crime News)

त्यांच्याजवळ गेल्यानंतर ओंकार पवारने यश बोरकरला विचारले की, हाच तुला त्रास देणारा आहे काय, यावर यश बोरकर हो म्हणाला. त्यानंतर ओंकार पवारने त्याच्या कमरेला लावलेला कोयता काढुन फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारण्यास सुरूवात केली.
आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर कोयताने वार केला मात्र फिर्यादीने त्याचा बचाव केला. फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटावर वार झाला.
ते जखमी झाले. काही ओरोपींनी फिर्यादीला धरले आणि  ओंकारने वार केला. त्यावेळी त्यांच्या डोक्याच्या मागे मार लागला.

घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, उपनिरीक्षक नितीन शिंदे आणि इतरांनी घटनास्थळी भेट दिली.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अतुल थोरात करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Attempted murder of youth near Hotel Torana on Old Katraj Ghat Road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | राम नवमीच्या दिवशी उद्धव ठकरेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले-‘सध्या राजकारणात श्रीरामाचे नाव घेऊन दगड…’

Nandurbar Police | नंदुरबार पोलीस दलाच्या ‘अक्षता समिती’ने थांबविला बालविवाह

Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी