Pune Crime News | दारुड्या ड्रयव्हर पतीने पत्नीवर केले चाकूने सपासप वार, लहानग्या मुलांमुळे वाचले आईचे प्राण; पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दारुच्या नशेत पत्नीच्या पोटात चाकूने सपासप वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याचा प्रकार वारजे येथे घडला. सुदैवाने मुलांनी आरडा ओरडा केल्याने चाळीतील लोकांनी धाव घेतल्याने महिलेचा जीव वाचविण्यात यश आले. (Pune Crime News)

याप्रकरणी वारजे पोलिसांनी दारुडा पती हेमंत मधुकर सोनवणे (वय 37, रा. विठ्ठलनगर, वारजे) याला अटक (Arrest) केली आहे. हा घटना गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. याप्रकरणी प्रियांका हेमंत सोनवणे (वय 26) यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पती व दोन मुलांसह वारजे येथे राहतात. हेमंत हा ड्रायव्हर असून त्याला रोज दारु पिण्याची सवय आहे. त्यामुळे पतीपत्नीत घरातील किरकोळ कारणावरुन वाद होत होते. घटनेच्या दिवशी फिय़ादी या आजारी असल्याने त्या झोपल्या होत्या. त्यावेळी आरोपी फिर्यादींना म्हणाला, माझे अंग दुखत आहे व मला दारु पिल्याशिवाय झोप येत नाही. तो अतुलनगर येथे जाऊन दारु घेऊन आला. येताना दारुची बाटली, एक चाकू व प्लास्टिकची दोरी त्याने खिशात लपवून आणल्या. त्याने घरातच दारु पिली. त्यानंतर तो फिर्यादीला म्हणाला, दुपारी तू माझी आई, बहिण का काढलीस व माझ्याशी का भांडलीस, असे म्हणत रागाच्या भरात त्याने खिशातील दोरी काढली. फिर्यादीच्या गळ्याला पूर्णपणे गुंडाळली व दोरी आवळू लागला. फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्याने आणखी दोरी आवळली.

तेव्हा त्यांच्या गळ्याला कापले व त्यातून रक्त येऊ लागले.
तेवढ्यात ती दोरी तुटल्याने फिर्यादी यांनी आणखी विरोध करु लागल्या.
त्याने पँटच्या मागील खिशामध्ये ठेवलेला चाकू काढला व त्याने फिर्यादीला धमकावले.
तू कोणाला काही सांगू नकोस नाही तर या चाकूने तुला मारीन, असे म्हणून त्याने फिर्यादींच्या पोटात
ठिकठिकाणी सपासप भोसकले. त्यांनी आरडाओरडा सुरु केला.
तेव्हा त्यांची दोन्ही मुले उठली व ते दोघेही आरडाओरडा करु लागली. मोठ्या मुलाने घराचा दरवाजा उघडला.
त्यांचा आरडाओरडा ऐकून चाळीतील लोक जमा झाले. त्याने फिर्यादीच्या पाठीत आणखी एक वार केला.
तेव्हा लोकांनी त्याला पकडले. फिर्यादी यांना प्रथम माई मंगेशकर हॉस्पिटल व तेथून ससून रुग्णालयात दाखल
केले आहे. पोलिसांनी पती हेमंत सोनवणे याला अटक केली आहे.

Web Title :- Pune Crime News | Attempting to kill his wife by stabbing her in the stomach with a knife and hanging her neck with a rope; Drunken husband arrested by Warje police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोटजातीत लग्न केल्याने श्रीगौड ब्राह्मण समाजाच्या जातपंचायतीने टाकले वाळीत, बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार

Devendra Fadnavis | ठाकरे-आंबेडकरांच्या युतीवर फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकरांना माहिती नाही की…’