
Pune Crime News | प्रॉपर्टीच्या कारणावरुन साडी चोरुन करणी करण्याचा प्रयत्न; मामा, आजी, ‘देवऋषी’सह सहा जणांवर गुन्हा दाखल
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | प्रॉपर्टीच्या कारणावरुन आईची साडी चोरुन नेऊन त्याला अंडी टाचणे, करणी करण्याचा (Black Magic) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात सावत्र आई, मामा, आजी, चुलत बहिण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
याबाबत जनवाडीत राहणाऱ्या एका २८ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६६५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कांता सुरेश चव्हाण Kanta Suresh Chavan (वय ७०), गिरीश सुरेश चव्हाण Girish Suresh Chavan (वय ३५, दोघे रा. जनवाडी), संगीता सुपेकर (वय ४५), स्वप्निल सुपेकर (वय २३), सोनल प्रविण सुपेकर Sonal Pravin Supekar (वय ३०), देवऋषी स्वप्नील भोकरे (तिघे रा. कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जनवाडी येथे ११ व १३ ऑगस्ट रोजी घडला होता. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची आजी कांता चव्हाण या शेजारी शेजारी रहातात.
फिर्यादी यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले असून त्यांची सावत्र आई कोथरुडमध्ये राहतात.
फिर्यादी यांच्या आईची घराबाहेर वाळत घातलेली साडी चोरीला गेली. त्यांनी तेथील सीसीटीव्ही तपासले.
तेव्हा त्यांची आजी व तिच्याकडे भाड्याने राहणार्या मुलीने ती चोरुन नेल्याचे दिसले. १३ ऑगस्ट रोजी फिर्यादी हे
शेजारील आजीच्या घरात गेले. तेथे त्यांची आई, मावशी, काकु यांचे फोटो ठेवून त्यांच्या फोटोस व आईचे साडीचे बाजूला अंडी, टाचण्या लावलेले लिंबु, भेळ, भात काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती, कापूर पदार्थ ठेवले होते. देवऋर्षी मंत्रोउच्चार करीत होते. तेव्हा फिर्यादी यांनी माझ्या आईची साडी घेऊन काय करता, असे विचारले. आजी कांता चव्हाण हिने तुम्हाला भिकेला लावले, आमची प्रॉपर्टी घेतली. आम्ही तुमच्यावर करणी करुन तुम्हाला मारुन टाकणार आहे, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबामध्ये भिती निर्माण झाली आहे.
पोलिसांनी जादुटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक जानकर (Police Inspector Jankar) तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Milk Tea Side Effects | पिऊ नये दुधाचा चहा, शरीरात निर्माण होऊ शकतात या ७ गंभीर समस्या
Healthy Oils | कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठी जेवणात या ५ निरोगी तेलांचा करा वापर