Pune Crime News | खून व मोक्का गुन्ह्यातील महिला आरोपीला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पिंपरी चिंचवड येथील खून (Murder) आणि मोक्का कायद्या अंतर्गत ((MCOCA Action) Mokka गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणातील महिला आरोपीला जामीन मंजूर (Bail Granted) करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र विशेष मोक्का (District and Sessions Special Mokka Court) न्यायाधीश पी. पी. जाधव (Judge P. P. Jadhav) यांनी आरोपीचा जामीन मंजूर केल्याची माहिती ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर (Adv. Jitendra Ashok Janapurkar) यांनी दिली. या गुन्ह्यात (Pune Crime News) मूळ आरोपी, विधी संघर्षित, आणि फरार असे एकूण 30 आरोपी विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच फिर्यादी यांच्या फिर्यादनुसार अर्जुन हा मयत विशाल नागू गायकवाड याचा भाऊ आहे. चिंचवड येथील परशुराम चौक परिसरात 2 डिसेंबर 2022 रोजी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जुन्या भांडणाचा राग मनात धरून व व्यावसायिक स्पर्धेतून झालेल्या वादातून कट करून विशाल गायकवाड याच्यावर कोयते, पालघन, तलवारीने वार करून जीवे ठार मारले. आणि बंदुकीच्या गोळ्या हवेत झाडून (Firing) दहशत पसरवली. (Pune Crime News)

या प्रकरणातील महिला आरोपी रेखा विष्णू लष्करे यांनी ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्यामार्फत जामीनाचा अर्ज विशेष मोक्का न्यायालयात दाखल केला होता. आरोपीचे वकील यांनी त्यांची बाजू मांडली, एफ.आय.आर. आणि फिर्यादनुसार अर्जदार आरोपी यांची या गुन्ह्यात भूमिका नाही. अर्जदार आरोपी घटनास्थळी उपस्थित नव्हते. तक्रारी किंवा पुरवणी निवेदनात आरोपी यांच्यावर आरोप नाही. आरोपी ही 43 वर्ष वयाची महिला आहे ती गृहिणी आहे.

आरोपाप्रमाणे अर्जदार आरोपी यांनी कट रचला असे असले तरी ते आरोप परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहेत.
अर्जदार आरोपी विरुद्ध मोका कायद्याअंतर्गत तरतुदी लागू केल्या असल्या तरी ती सवयीची गुन्हेगार नाही
तिची स्थिती वय आणि तिच्याविरुद्ध नियुक्त केलेली भूमिका लक्षात घेता, असे म्हणता येणार नाही की
जामीनाविरुद्ध मोका कायद्यातील बार सध्याच्या अर्जदाराला लागू आहे.
आरोपी यांना खोट्या केसमध्ये आरोपी केले आहे.

आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र विशेष मोक्का न्यायाधीश पी. पी. जाधव कोर्टाने आरोपीला अटी
व शर्तीवर जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहे.
आरोपी रेखा विष्णू लष्करे यांच्या वतीने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी जामीन मिळण्यासाठी युक्तिवाद केला.
तसेच ॲड. आनंद चव्हाण (Adv. Anand Chavan), ॲड. अक्षय पवार (Adv. Akshay Pawar),
ॲड. मयूर चौधरी (Adv. Mayur Chaudhary) यांनी मदत केली.

Advt.

Web Title : Pune Crime News | Bail granted to female accused in murder and attempted murder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’, भाजप नेत्याचा शरद पवारांवर ‘प्रहार’

Devendra Fadnavis | ‘एकाचवेळी औरंगजेब व टीपू सुलतानचे उदात्तीकरण हा योगायोग नाही, आम्ही हे खपवून घेणार नाही’, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)

Former NCP Legislator Ramesh Kadam Bail | माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर; पण.. राहावे लागणार तुरुंगातच