Pune Crime News | पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | व्यावसायिक व्यवहार आणि जमिनीच्या वादातून पुण्यातील नऱ्हे येथे एका हॉटेल व्यवसायिकाचा खून (Pune Murder Case) करण्यात आला होता. या गुन्ह्यातील (Pune Crime News) मुख्य आरोपीला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे (District and Additional Sessions Judge V. R. Kachare) यांनी जामीन मंजूर (Bail Granted) केला असल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. प्रतिभा पवार (Adv. Pratibha Pawar) यांनी दिली.

 

सुनील लागोरे (Sunil Lagore) असे खून झालेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव असून ही घटना जून 2020 मध्ये सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. हॉटेल व्यवसायिक सुनील लागोरे याचा व्यवसायिक व्यवहारातून व जमिनीच्यावादातून धारधार शस्त्राने खून करण्यात आला होता याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी 6 आरोपींना तांत्रिक पुराव्याचा आधार घेऊन अटक (Arrest) केली होती.

 

तपासाच्या दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले 2 कोयते, गुन्हा करतेवेळी अंगावर असणारे रक्ताचे डाग असणारे कपडे, आरोपीच्या विरोधात काही साक्षीदारांचे जबाब नोंदविले होते. तसेच तांत्रिक तपासादरम्यान घटनास्थळावरील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचे मोबाईल टॉवर लोकेशन व आरोपींचे कटासंबधित कॉल रेकॉर्डिंग असे पुरावा गोळा करून दोषारोपपत्र (Charge Sheet) न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

यापुर्वी गुन्ह्यातील इतर 5 आरोपी संतोष नाकती, यशवंत घावरे, आकाश दामगूडे, सुधीर कामठे,
रविन्द्र भोसले यांचा जामीन सत्र न्यायालयाने मंजूर केल्यानंतर आरोपीचे वकील अ‍ॅड. प्रतिभा पवार
यांनी मुख्य आरोपी गणेश घावरे याचा जामीन अर्ज दाखल केला होता.

 

अ‍ॅड. प्रतिभा पवार यांनी यूक्तिवाद करताना सदरचा आरोपी संबधित पुरावा विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
व इतर आरोपींना जामिनावर मुक्त करण्यात आले आहे त्याचप्रमाणे याही आरोपीचा जामिन मंजूर करण्यात यावा अशी विनंती केली.
न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

 

Web Title :- Pune Crime News | Bail granted to prime accused in Pune hotelier’s murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhumi Pednekar | भूमीच्या ‘त्या’ लूकमुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले – ‘कोणीतरी हिला चांगला डिझाईनर द्या….’

Pune News | कैद्यांना नातेवाईकांशी महिन्यातून 3 वेळा बोलता येणार, कारागृह प्रशासनाचा निर्णय

Avadhoot Gupte | ‘या’ कारणासाठी ‘झेंडा’ चित्रपटानंतर स्वतः बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन