Pune Crime News | सह्याद्री इस्टेट पॉलीसीत गुंतविलेले पैसे परत मागितल्याने मारहाण करुन करुन केला विनयभंग; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | सह्याद्री इस्टेट पॉलिसीत गुंतवलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन महिलेच्या पतीला मारहाण (Beating) करुन त्याला सोडविण्यास आलेल्या फिर्यादीचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Pune Police) चौघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

विशाल शिवाजी शिंदे (वय ३५), स्वप्नील विलास कदम (वय २४), शिवाजी रामचंद्र शिंदे (वय ७५, सर्व रा. तरडे, लोणी काळभोर) आणि एका महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार तरडे वस्ती येथील जगताप मळामध्ये ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडला होता.

याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२६/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात.
वैशाली विलास कदम यांनी सह्याद्री इस्टेट नावाची पॉलिसी २०१३ मध्ये सुरु केली होती.
तेव्हा फिर्यादी यांनी त्यामध्ये पैसे भरले होते. नंतर पॉलिसी बंद पडल्याने त्यांनी पैसे परत मागितले.
मात्र, त्यांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. ७ फेब्रुवारी रोजी फिर्यादीचे पती यांनी कदम यांच्याकडे पैशांची मागणी
केली असता त्यांनी पतीस मारहाण केली.
पतीला सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करुन त्यांचा विनयभंग केल्याने
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Beaten and molested for demanding return of money invested in Sahyadri Estate Policy; A case has been registered against four persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Krushi Utpanna Bazar Samiti | कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सुधारित प्रारुप मतदार यादी 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार; राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने पैसे परत केल्यानंतरही धमकाविणार्‍या गुंडावर कारवाई

Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या