Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : बिबवेवाडी पोलिस स्टेशन – पोलीस ठाण्यातच पोलिसांच्या मारली कानाखाली; बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune Crime News | विना हेल्मेट जात असताना थांबविलेल्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याने आपल्या मैत्रिणीला बोलावून घेतले. पोलिसांबरोबर हुज्जत घालून त्यांच्या कानाखाली मारली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) २८ मे रोजी रात्री पावणेबारा वाजता हा प्रकार घडला.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गौरव हरीष वालावकर Gaurav Harish Walavkar (वय २९) आणि सुचेता चेतन घुले Sucheta Chetan Ghule (वय २८, दोघे रा. चिंतामणी रेसिडेन्सी, बिबवेवाडी – Chintamani Residency Bibwewadi) यांना अटक केली आहे.

याबाबत सहायक फौजदार रामदास बांदल (वय ५७) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०२/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूला विमल विहार सोसायटीजवळ २८
मे रोजी रात्री नाकाबंदी लावण्यात आली होती. यावेळी फिर्यादी, सहायक पोलीस निरीखक बरडे व इतर सहकारी
हे नाकाबंदी करत असताना गौरव वालावकर हा दुचाकीवरुन विना हेल्मेट (Without Helmet) जात होता.
पोलिसांनी त्याला अडवून आरसी बुक व लायसन्स दाखविण्यास सांगितले.
त्याने कोणतीही कागदपत्रे न दाखवता फिर्यादी यांच्यासोबत हुज्जत घातली. त्याने सुचेता घुले हिला बोलावून घेतले.
नंतर पोलीस ठाण्यात त्याला आणल्यावर गौरव याने अचानक फिर्यादी यांच्या कानाखाली मारुन आता काय करायचे ते करा असे बोलून फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आदलिंग तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Beaten by the police in the police station itself; Incident at Bibvewadi Police Station

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘काँग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंची लाचारी!!’, ‘ते’ फोटो ट्विट करत भाजपचा टोला

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : तुमच्या भागातील नाले सफाईची कामे झाली नसतील तर ‘या’ 2 मोबाईलवर संपर्क साधा, जाणून घ्या नंबर

Adipurush Cinema | आदिपुरूष चित्रपटाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या तासाभरात केला मिलियनस टप्पा पार (VIDEO)