Pune Crime News | पैसे काढून घेताना अडवल्याने मारहाण करुन खून, पुणे-सातारा रोडवरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जबरदस्तीने पैसे काढून घेणाऱ्या दोघांना प्रतिकार केल्याने एका तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खून (Murder) केला. हा प्रकार पुणे-सातारा रोडवरील (Pune-Satara Road) हेमी प्लाझा येथे शुक्रवारी मध्यरात्री घडला आहे. याप्रकरणी (Pune Crime News) भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidhyapeeth Police Station) एका सराईत गुन्हेगाराला आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

 

महादेव नागनाथ चेंडके (वय-22 रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. महादेव हा मजुरी करत होता. याप्रकरणी सराईत गुन्हेगार प्रदीप हिरालाल शिंदे (वय-19 रा. आष्टी, श्रीगोंदा) याला अटक (Arrest) केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव चेंडके हा रस्त्यावर मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. शवविच्छेदन अहवालात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी आरोपींची माहिती मिळाली.

 

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.
शिंदे हा श्रीगोंदा येथे राहत असून तो त्याचा अल्पवयीन साथीदाराला भेटण्यासाठी पुण्यात आला होता.
शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी पैशांसाठी महादेव याला अडवले.
त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेत असताना महादेवने प्रतिकार करताच आरोपींनी त्याला मारहाण करुन त्याचा खून केला.

 

Web Title :- Pune Crime News | Beating to death for obstructing withdrawal of money, incident on Pune-Satara road

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | उरुळी कांचन येथील दारु अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime News | नूडल्सचं आमिष दाखवून शेजाऱ्याकडून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

MC Stan | बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन लवकरच अडकणार लग्नबंधनात