Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

पुणे : Pune Crime News | तुम्हाला रुम भाड्याने द्यायची आहे. समोरची व्यक्ती रुम पाहण्याअगोदरच भाडे व डिपॉझिट ऑनलाईन देण्यास तयार असेल तर, सावधान, तो सायबर चोरटाही (Cyber Crime) असू शकतो. एका महिलेला सायबर चोरट्याने ९९ हजार ९९० रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)
याबाबत रास्ता पेठेत राहणाऱ्या एका ३० वर्षाच्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७४/२३) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची खराडी येथे रुम आहे. ती भाड्याने द्यायची आहे.
गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी त्यांना एक फोन आला. तुमची रुम भाड्याने घेण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले.
ऑनलाईन डिपॉझिट पाठवित असल्याचे सांगून त्यांच्याकडून बँकेची गोपनीय माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९० रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक (Fraud Case) केली. पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत. (Pune Crime News)
सध्या अनेक जण घर, रुम भाड्याने देत असतात. त्याच्या जाहिराती सोशल मीडियावर करत असतात.
त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे फसवित आहेत. तेव्हा घर, रुम न पाहता, प्रत्यक्ष न येता डिपॉझिट,
भाडे ऑनलाईन देण्यास कोणी तयार असेल तर सावध रहा. कोणालाही बँक खात्याची माहिती देऊ नका,
असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Web Title :-Pune Crime News | Beware of renting a room; Fraud of a woman on the pretext of sending a deposit
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update