Pune Crime News | ‘आम्ही जनता वसाहतीमधील भाई, खेकडा गँगच्या नादी लागला तर…’, मुलीकडे बघितल्याच्या संशयावरुन शाळकरी मुलावर कोयत्याने वार

नुमवि शाळेजवळील बस स्टॉपसमोरील घटना

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोयता गँगने (Pune Koyta Gang) दहशत पसरवली आहे. हा प्रकार शहराच्या मध्यवर्ती भागात सर्रास सुरु आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांमध्ये पोहचल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पुण्यातील नुतन मराठी विद्यालय Nutan Marathi Vidyalaya Pune (नुमवि – NMV Pune) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला (Student Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime News) समोर आला आहे. या घटनेत 17 वर्षाचा विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्यावर 7 मुलांनी हल्ला केला.

 

साऊथ चित्रपटांमध्ये (South Movies) एकमेकांच्या अंगावर धाऊन जात कोयत्याने मारहाण केल्याचे दाखवले जाते. तशाच पद्धतीने पुण्यात कोयता गँग दहशत पसरवत आहे. आता तर थेट शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी (Pune Police) काल याच शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना समुपदेशन (Counselling) केले होते.

याप्रकरणी जखमी मुलाच्या भावाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सात जणांवर आयपीसी 307, 323, 504,506,143,147,148,149 सह क्रिमिनल लॉ अमिनमेंट अॅक्ट, आर्म अॅक्टनुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.31) सकाळी 11 वाजता नुमवि शाळेजवळील बसस्टँडजवळ घडला. आरोपींची नावे निष्पन्न झालेली असून ते अल्पवयीन आहेत की सज्ञान हे समजू शकले नाही. (Pune Crime News)

 

जखमी 17 वर्षीय विद्यार्थी हा बारावीत शिकत असून तो पद्मावती परिसरात राहतो. आपल्या मैत्रिणीकडे पाहिल्याचा गैरसमज करुन आरोपींनी फिर्यादी यांच्या लहान भावाला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळ असलेल्या लाकडी बांबू आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) केली. तर एका आरोपीने ‘आज इसको खल्लास करता हुँ’ असे म्हणून हातातील कोयता फिर्यादी यांच्या भावाच्या दिशेने फेकला. त्यांच्या भावाने कोयत्याचा वार चुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोयता डाव्या कानाच्या वरच्या बाजुच्या डोक्यात जोरात लागला. यानंतर ‘आम्ही जनता वसाहतीमधले भाई आहोत, खेकडा गँगच्या जर कोणी नादाला लागाल तर बघा, सोडणार नाही’ असे म्हणत आरोपींनी याठिकाणी दहशत माजवली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने (Senior PI Sunil Mane),
पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड (Police Inspector Dada Gaikwad),
महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम (PSI Priyanka Nikam),
पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे (PSI Manoj Barure) यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Bhai Log from Janata Vasahita, if we get involved in
the Khekda gang…’, a school boy was stabbed with a spear on suspicion of looking at a girl,
Incident in front of bus stop near NMV School Appa Balwant Chowk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा