Pune Crime News | गणेशोत्सवात पिस्तुल बाळगणाऱ्या परराज्यातील तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, पिस्तुलासह 3 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात गणेशोत्सव उत्साहात (Pune Ganeshotsav 2023) साजरा केला जात आहे. गणपती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच स्थानिक पोलीस ठाण्याच्या (Local Police Station) हद्दीत पोलिसांची गस्त वाढवली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharati Vidyapeeth Police Station) तपास पथकाने हद्दीत गस्त घालताना परराज्यातील एका तरुणाला अटक करुन एक गावठी बनावटीची पिस्तुल आणि काडतुसे जप्त (Pistols Seized) केली आहेत. (Pune Crime News)

सतीश गुलाबराव शेरके Satish Gulabrao Sherke (वय-23 सध्या रा. शिंदेवाडी शिरवळ, ता खंडाळा जि. सातारा मुळ रा. मु.गोहजर, पो. सारंग बिहारी, तहसील मोखेड, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलस ठाण्यात आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मंगेश पवार (Police Officer Mangesh Pawar) व निलेश खैरमोडे यांना माहिती मिळाली की, कात्रज घाटातील भिलारेवाडी येथील पेट्रोल पंपाच्या समोर एक तरुण उभा असून त्याच्या कंबरेला पिस्तुल आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना भिलारेवाडी येथील कात्रज घाटाच्या
चढाच्या रोडवर एक तरुण संशयितरित्या उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती
घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल आणि तीन काडतुसे आढळून आली.
त्याच्याकडून पिस्तुल आणि काडतुसे असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (ACP Pravin Kumar Patil),
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर
(ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड
(Senior PI Vinayak Gaikwad), पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक (PI Vijay Puranik), गिरीश दिघावकर,
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta),
पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, चेतन गोरे, महेश बारावकर, शैलेश साठे, निलेश ढमढेरे,
अवधुत जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे,
विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar Group | आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘अजित पवार गटाकडून नेत्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू, सही कर नाहीतर…’