Pune Crime News | खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | डोक्यात रॉडने मारुन खून (Murder) करुन फरार झालेल्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही घटना (Pune Crime News) 13 डिसेंबर 2022 रोजी रात्री साडेदहा ते अकरा यावेळेत आंबेगाव खुर्द येथील दुगड शाळेजवळ घडली होती. गुन्ह्यातील फऱार आरोपींना जुना कात्रज बोगद्याजवळून (Old Katraj Tunnel) अटक केली.

प्रकाश निवृत्ती रेणुसे (वय- 27 रा. कांबळे चाळ, दुगड शाळेजवळ, आंबेगाव खुर्द, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दत्ता राहुल कदम (वय -22 रा. साई मंदिराजवळ, आंबेगाव खुर्द), अजय सदाशिव रेणुसे (वय-24 रा. गणपती मंदिराजवळ, आंबेगाव खुर्द) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharati Vidyapeeth Police Station) पोलीस हवालदार अनिल प्रल्हाद भोसले (Police Constable Anil Prahlad Bhosale) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

13 डिसेंबर 2022 रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान आरोपींनी प्रकाश रेणुसे याला डोक्यात रॉड आणि दगड मारुन बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रकाश रेणुसे याला तातडीने ससुन हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान 19 डिसेंबर 2022 रोजी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध आयपीसी 302, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला होता.

गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांना प्रकाश रेणुसे याचा खुन करणारे दोन आरोपी दत्ता कदम आणि अजय रेणुसे हे जुना कात्रज बोगद्याजवळ नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार आहेत. नातेवाईकांना भेटल्यानंतर ते तेथून निघून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी जुना कात्रज बोगद्याजवळ सापळा रचून दोघांना अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक (Police Inspector Vijay Puranik),
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal),
पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta),
पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे,
शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले,
धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, आशिष गायकवाड,
अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Bharti University police arrested two absconding accused in the crime of murder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shubman Gill | शुभमन गिलने शतकी खेळी करत ‘हे’ विक्रम केले आपल्या नावावर; दिग्गजांनाही टाकले मागे

Maharashtra MLC Elections | कोकणात महाविकास आघाडीला मोठा धक्का; कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

Pandharpur News | माघी वारीत उपवासाच्या पदार्थांचं सेवन केल्यानं वारकर्‍यांना विषबाधा, 137 भाविक रूग्णालयात