Pune Crime News | कामगार महिलांना लुटणाऱ्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कामगार महिलांना (Working Women) काम देतो असे सांगून निर्मनुष्य ठिकाणी नेऊन लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीला (Robbing Gang) भारती विद्यापीठ पोलिसांच्या (Pune Police) तपास पथकाने बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून कामगार महिलांकडून लुटलेला मुद्देमाल जप्त केला आहे. हा प्रकार (Pune Crime News) 24 जुलै रोजी सकाळी 11 च्या सुमारास जुन्या कात्रज बोगद्याजवळ (Old Katraj Tunnel) घडला होता.

याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News) फिर्यादी व त्यांच्या सहकारी यांना आरोपींनी आमच्या सोबत कामासाठी चला असे सांगून प्रवासी चार चाकी गाडीतून जुन्या कात्रज बोगद्यापलिकडे घेऊन गेले. आरोपींनी महिलांना गाडीतून उतरवून डोंगराकडे जाणाऱ्या निर्मनुष्य कच्च्या रस्त्यावर नेऊन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी नितीन साहेबराव चव्हाण (वय-30), संतोष नागोराव कानोडे (वय-20) सुकलाल बाजीराव गिरी (वय-19), सुनिल नारायण गिरी (वय-19 सर्व रा. रा. सहयोग नगर, वारजे माळवाडी मुळ रा. ता. अर्धापूर, जि. नांदेड) यांना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यातील 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर
(ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक (PI Vijay Puranik),
गिरीशकुमार दिघावकर (PI Girishkumar Dighavkar),
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal),
पोलीस अंमलदार शैलेश साठे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले,

चेतन गोरे, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | विधानसभेत कुणाचा विरोधी पक्षनेता?,
शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर नाना पटोले म्हणाले… (व्हिडिओ)