Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून कात्रज चौकात रात्रीच्या वेळी परराज्यातील प्रवाशांना लुटणार्‍यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कात्रज चौकात (Katraj Chowk) रात्रीच्या वेळी परराज्यातील प्रवाशांना लुटणार्‍या (Pune Robbery) दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) अटक केली असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune Crime News)

राजु नागनाथ कांबळे उर्फ काळया Raju Nagnath Kamble Alias Kalya (20) आणि अथर्व रविंद्र आडसुळ Atharva Ravindra Adsul (20, दोघे रा. गल्ली नंबर 77, तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे – Taljai Vasahat Padmavati Pune) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 1 जून 2023 रोजी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास अटक आरोपी आणि त्यांच्या अल्पवयीन साथीदारांनी एका परराज्यातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवुन लुटले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपींचा पोलिस शोध घेत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार अवधुत जमदाडे, पोलिस अंमलदार अभिनय चौधरी आणि पोलिस अंमलदार आशिष गायकवाड यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील लोखंडी कोयता, गुन्हयात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील
(IPS Smartana Patil), सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार (Sr. PI Vijay Kumbhar),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik), सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ
(API Amol Rasal), पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta), पोलिस अंमलदार अवधुत जमदाडे,
पोलिस अभिनय चौधरी, पोलिस आशिष गायकवाड, पोलिस सचिन सरपाले, पोलिस शैलेश साठे, पोलिस चेतन गोरे,
पोलिस निलेश ढमढेरे, पोलिस मंगेश पवार, पोलिस हर्षल शिंदे, पोलिस अभिजीत जाधव, पोलिस सचिन गाडे, पोलिस धनाजी धोत्रे, पोलिस निलेश खैरमोडे, पोलिस राहुल तांबे आणि पोलिस विक्रम सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Advt.

Web Title :   Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police arrested those who robbed passengers at night in Katraj Chowk Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, टीका करताना शरद पवारांचा एकेरी उल्लेख (व्हिडिओ)

Sulochana Latkar Death | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Gahunje Maval Murder Case | गहुंजेतील सुरज काळभोर खून प्रकरणाला वेगळं वळण, ‘या’ कारणावरून पत्नीनेच ‘गेम’ केल्याचं आलं समोर