Pune Crime News | एटीएम मशिनला टेंम्परींग करुन ग्राहकांना गंडा घालणाऱ्या परराज्यातील दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police arrested two foreigners who cheated customers by tampering ATM machines

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एटीएम मशिनला टेम्परिंग (ATM Machine Tampering) करून ग्राहकांना गंडा (Cheating) घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) परराज्यातील दोघांना अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी 2 ऑगस्ट रोजी महाराणा प्रताप चौकातील एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) एटीएम सेंटर जवळ ही कारवाई (Pune Crime News) केली असून आरोपींकडून 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

धर्मेंद्र श्रीशिवलाल सरोज (वय-30 रा. गाव मशेरा, तहसील कुंडा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश), सोनुकुमार जगदेव सरोज (वय-28 रा. गाव बदगावा, तहसील कुंडा, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharati Vidyapeeth Police Station) तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना महाराणा प्रताप चौकातील (Maharana Pratap Chowk) एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनजवळ दोन संशयित आढळून आले.

पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता आरोपी एटीएम मशीन टेंम्परींग करुन त्यावर
पट्टी लावून ग्राहकांचे पैसे काढत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून सहा हजार रुपये रोख, टेंम्परीग करण्यासाठी वापरलेली पट्टी, मोबाईल असा एकूण 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपींनी पुणे शहरातील विविध ठिकाणावरील एटीएम मशीन टेंम्परींग करुन पैसे काढल्याची कबुली दिली आहे. त्यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Pune Crime News

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर
(ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक (PI Vijay Puranik), गिरीशकुमार दिघावकर (PI Girishkumar Dighavkar),
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal) पोलीस अंमलदार दिनेश वीर, योगेश घोडके, सचिन सरपाले,
नरेंद्र महांगरे, चेतन गोरे, अभिनय चौधरी, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव,
अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, राहुल तांबे,
विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parking Regulations Revamped at Kokane Chowk in Pimple Saudagar to Enhance Traffic Flow

Total
0
Shares
Related Posts