Pune Crime News | सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात राडा घालणार्‍यांना पोलिसांनी पाठलाग करुन ‘धु धु धुतले’

पुणे : Pune Crime News | शहरातील कोयता गँगचा विषय थेट विधानसभेत उपस्थित झाला असताना बुधवारी रात्री पुन्हा एकदा आंबेगाव (Ambegaon Pune) येथील सिंहगड विधी महाविद्यालय (Sinhgad Law College) परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत माजविली. समोर दिसेल त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केल्याने एकच खळबळ उडाली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. कोयता घेऊन रस्त्याने फिरणार्‍याचा पाठलाग करुन त्याला गाठले व धु धु धुतले. या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. (Pune Crime News)

सुजित रावसाहेब गायकवाड (Sujeet Raosaheb Gaikwad) आणि करण दळवी Karan Dalvi (दोघेही रा. वडगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी करण दळवी याला पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी अथर्व सुनिल लाडके (वय २०, रा. आंबेगाव) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

आंबेगाव परिसरातील विधी महाविद्यालयासमोरील खाऊ गल्लीत रात्री दहाच्या सुमारास करण व त्याचा साथीदार कोयते फिरवत आले. त्यांनी सुरुवातीला रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेथील एका हॉटेलमध्ये घुसून एका ग्राहकावर कोयत्याने वार (Attempt To Murder) केला. तेथून बाहेर येऊन पुन्हा रस्त्याने जाणार्‍या येणार्‍या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. (Pune Crime News)

एकाच्या पाठीवर प्लॅस्टिकचा स्टुल फेकून मारला.
या दोघांनी या परिसरात साधारण २० ते २५ मिनिटे धुडगुस घातला.
सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती मिळताच मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले हे तातडीने तेथे पोहचले.
तेव्हा करण हा हातात कोयता घेऊन भर रस्त्यावर फिरत होता. त्यांनी दुचाकीवरुनच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले.
भर रस्त्यात काठीने त्याला धु धु धुतला. या सर्व प्रसंगाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
अशा गुंडाना भर चौकात असेच तुडवले पाहिजे, म्हणजे गुंडांची नाही तर पोलिसांची दहशत बसेल,
अशा प्रतिक्रिया उमटत आहे.

Web Title :- Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police Sinhagad Law College Area Two Arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’

Ajit Pawar | ‘मी बिलंदर शब्द तुमच्यासाठी वापरणार नाही, पण…’ अजित पवारांचा फडणवीसांना खोचक टोला