Pune Crime News | बिबवेवाडी: पतीच्या छळामुळे नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; अवघ्या तीन महिन्यातच संपविले आयुष्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | पतीच्या मानसिक त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

गौरी चेतन सोनवणे Gauri Chetan Sonwane (वय १९, रा. ओटो स्कीम, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी तिचा भाऊ महेश रामभाऊ मोहिते (वय २५, रा. सासवड) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन संजय सोनवणे Chetan Sanjay Sonwane (वय २५) आणि प्रगती संजय सोनवणे Pragati Sanjay Sonwane (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी हिचा चेतन सोनवणे याच्याबरोबर २९ मे २०२३ रोजी विवाह झाला होता.
चेतन हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. लग्नानंतर पती वारंवार दारु पिऊन येऊन गौरी हिला मानसिक त्रास देत होता. तिला मारहाण करीत होता. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यातच या छळाला कंटाळून गौरी हिने १७ सप्टेबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) तपास करीत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Health Tips | इम्युनिटी वाढवण्यासाठी नियमित काढा पिता का? शरीराच्या या अवयवांचे होते नुकसान

MLAs Disqualification Case | आमदार अपात्र कारवाईला वेग, विधानसभा अध्यक्ष शिंदे-ठाकरे गटाच्या प्रमुखांना नोटीस पाठवणार