Pune Crime News | बिबवेवाडी : पोलीस असल्याची बतावणी करीत महिलेला लुटले; पावणेचार लाखांचे दागिने पळविले

पुणे : Pune Crime News | पुढे पोलीस आहेत, तुम्ही अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगून महिलेने दागिने काढले असता ते घेऊन दोन चोरटे पळून गेले. (Pune Crime News)

याप्रकरणी धनकवडी येथील एका ५९ वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७९/२३) दिली आहे. हा प्रकार लोअर इंदिरानगर येथील बिबवेवाडी समोरुन महेश सोसायटीकडे जाणार्‍या रस्त्यावर रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पायी जात असताना एक जण त्यांच्याजवळ आला.
त्याने पुढे पोलीस आहेत, तुम्ही अंगावरील दागिने काढून ठेवा, असे म्हणाला.
त्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या गळ्यातील ३ लाख ८५ हजार रुपयांचे ७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र काढत होत्या.
तेव्हा चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून ते
साथीदाराच्या मोटारसायकलवरुन पळून गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव (Senior Police Inspector Jadhav) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Bibvewadi: Woman robbed by pretending to be police; Jewels worth fifty four lakhs were stolen

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ED Raid in Pune – Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील ९ ठिकाणी ईडीची छापेमारी

कोंढवा : चौकशी करणार्‍या बीट मार्शल पोलिसांना मारहाण करणार्‍या तिघांना अटक

Subhash Desai | मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले-‘त्याचं राजकीय अस्तित्व…’

 दत्तवाडी : 8 वर्षाच्या मुलावर दोन महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक