Pune Crime News | खळबळजनक ! पिंपरी-चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Crime News | नूतन वर्षाच्या सुरूवातीलाच एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी पिंपरी-चिंचवड परिसरातून (Pimpri Chinchwad Crime) समोर आली आहे. दि. 31 डिसेंबर रोजी दुपारी काळेवाडी परिसरातून (Kalewadi) बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत (The Lawyer’s Body Partially Burnt) महाराष्ट्र-तेलंगणा बॉर्डरवरील (Maharashtra Telangana Border) मदनुर येथे आढळून आला आहे. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

शिवशंकर शिंदे असे मृत झालेल्या वकिलाचे नाव आहे. अ‍ॅड. शिंदेंचे कार्यालय काळेवाडी परिसरात असून ते तेथून बेपत्ता झाल्या बाबतची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दाखल आहे. पोलिस त्यांचा शोध घेत असतानाच ही खळबळजनक बाब प्रकाशझोतात आली आहे. शिंदेंची हत्या की आणखी काय याबाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत.

थर्टी फस्टला दुपारी अ‍ॅड. शिवशंकर शिंदे (Adv Shivshankar Shinde) हे त्यांच्या कार्यालयातून बेपत्ता झाले होते. त्यांच्या परिवाराकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
त्यानंतर कुटुंबियांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात (Wakad Police Station) जावून तक्रार
(Missing Complaint) दिली. पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर काही तास उलटून गेल्यानंतर अ‍ॅड. शिंदे
यांचा अर्धवट जळलेला मृतदेह महाराष्ट्र-तेलंगणा बॉर्डरवर मदनुर येथे आढळून आला.
त्यामुळे सर्वांचीच भंबेरी उडाली असून प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, अ‍ॅड. शिंदेंच्या कार्यालयामध्येच
त्यांची एका अज्ञाताशी झटापट झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.
कार्यालयामध्ये तुटलेली बटन आणि रक्त आढळून आलं आहे.
अपहरण (Kidnapping) आणि त्यांनंतर हत्या (Pimpri Murder News) झाली काय असा संशय देखील
व्यक्त करण्यात येत असून पोलिस सर्व बाजूने तपास करीत आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकांनी (Pimpri Chinchwad Crime Branch) देखील घटनास्थळी भेट दिली
असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेजव्दारे देखील तपास सुरू आहे. (Pune Crime News)

एकंदरीत काळेवाडी परिसरातून कार्यालयातून बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह महाराष्ट्र-तेलंगणा
बॉर्डरवर आढळल्याने पिंपरी-चिंचवड आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | body of missing lawyer shivshankar shinde from kalewadi pimpri chinchwad pune found partially burnt at madanur on maharashtra telangana border crime news