Pune Crime News | इंदापूरमध्ये शेतकऱ्याच्या गोठ्यात आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील (Indapur Taluka) टण्णू गावात एका शेतकऱ्याच्या जनावरांच्या गोठ्यात बॉम्ब सदृश्य वस्तू (Bomb Like Object) आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकऱ्याने याबाबत (Pune Crime News) स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर याची शहानिशा करण्यासाठी बॉम्ब शोधक पथक (Bomb Squad) दाखल झाले.

टण्णू गावातील (Tannu Village) दत्तात्रय मोहिते या शेतकऱ्याला आपल्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. ही वस्तू निळ्या रंगातील असून वस्तू चेंडूसारखी व त्याच्या वरच्या बाजूला तोंड आहे. त्यामध्ये भरलेला पदार्थ दारूगोळ्याचा भाग असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. (Pune Crime News)

घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस (Indapur Police) आणि बॉम्ब शोध व नाश पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. श्वान पथकाने ही वस्तु डिटेक्ट केली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून पथकाकडून याची शहानिशा केली जात आहे. दुसरीकडे ही वस्तू आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ही वस्तू कुठून आणि कशी आली? याचाही पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Bomb-like object found in farmer’s cowshed in Indapur, excitement in the area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना