Pune Crime News | पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सन 2012 मध्ये पुणे शहरातील जंगली महाराज रोड (JM Road, Pune) परिसरातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील (JM Road Bomb Blast Case) आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर केला आहे. आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदारला सन 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. (Pune Crime News)

 

मुंबई उच्च न्यायालयाने सर्वप्रथम त्याला दि. 1 ऑक्टोबर 2015 रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, सन 2019 मध्ये जामीनाच्या अटीचं उल्लंघन केल्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) विनंतीवरून बंटी जहागीरदारचा जामीन उच्च न्यायालयाने रद्द केला होता (Pune Bomb Blast Case). सन 2020 मध्ये पुन्हा त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर त्याचा जामीन आता मंजूर करण्यात आला आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत एटीएसकडून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये मुनीब इक्बाल मेमन, इम्रान खान, सय्यद फिरोज, असद खान, फारूख बागवान, इरफान मुस्तफा लांडगे, काशिफ बियाबानी आणि असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांचा समावेश आहे. त्यांच्याविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. (Pune Crime News)

दि. 1 ऑगस्ट 2012 रोजी जेएम रोड परिसरात 5 साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटामध्ये एक जण जखमी झाला होता. डेक्कन परिसरात 6 ठिकाणी हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. त्यामधील 5 बॉम्ब काही मिनिटांच्या फरकाने ब्लास्ट झाले तर एक बॉम्ब फुटला नाही. संशयित आरोपींकडून हे बॉम्ब तयार करताना काही त्रुटी राहिल्यामुळे जंगली महाराज रोडवरील मोठी दुर्घटना टळली होती. मात्र, त्यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती.
5 बॉम्बपैकी पहिला बॉम्ब हा बालगंधर्व रंगमंदिराजवळ ठेवण्यात आला होता तर त्यानंतर मॅकडोनाल्ड कॅफे,
देना बँक, गरवारे पूल या ठिकाणी इतर बॉम्ब ठेवण्यात आले होते.

 

 

 

Web Title :- Pune Crime News | Bombay High Court granted bail to the accused in
the serial bomb blast case in Pune’s Jungli Maharaj Road area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा