Pune Crime News | पुण्यातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरातील येरवडा परिसरामध्ये खुनी हल्ला (Attempt To Murder In Yerwada)करुन दहशत पसरवणाऱ्या टोळीवर गँगच्या म्होरक्यासह 13 जणांवर मोक्का अंतर्गत MCOCA (Mokka Action) कारवाई करण्यात आली होती. मोक्का गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) न्यायाधीश एन.आर. बोरकर (Judge N.R. Borkar) यांनी जामीन मंजूर (Bail Granted In MCOCA Case) केला आहे. (Pune Crime News) अशी माहिती आरोपीचे वकील सिद्धांत मालेगांवकर (Adv. Siddhant Malegaonkar) व अ‍ॅड. ए.आर. अवचट (Adv. A.R. Avachat) यांनी दिली. शिवराज मनोज मिरगळ (Shivraj Manoj Mirgal) असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे.

किरकोळ कारणावरुन एकावर धारदार हत्यारांनी वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) IPC 307, 395, 452, 504, 506, 427, 201, 188 सह आर्म अ‍ॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट (Maharashtra Police Act), महामारी रोग कायदा (Epidemic Diseases Act), आपत्ती व्यवस्थापन कायदा (Disaster Management Act), महाराष्ट्र कोविड-19 कायदा (Maharashtra Kovid-19 Act), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जुलै 2021 मध्ये येरवडा परिसरात घडला होता. या गुन्ह्यातील आरोपी शिवराज मिरगळ याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Pune Crime News)

आरोपीने अ‍ॅड. सिद्धांत मालेगांवकर व अ‍ॅड. ए.आर. अवचट यांच्या मार्फेत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. यावर नुकतीच सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान अ‍ॅड. मालेगावकर व अ‍ॅड. ए.आर. अवचट यांनी युक्तीवाद करताना सांगितले, की आरोपीला या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे असून त्याने अशा प्रकारचा कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच या गुन्ह्यात आरोपीची कोणतीही स्पष्ट भूमिका दिली नसल्याने व आरोपी हा मागील दीड वर्षापेक्षा जास्त काळ कारागृहात आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद अ‍ॅड. मालेगांवकर व अ‍ॅड. ए.आर. अवचट यांनी केला.

न्यायालयासमोर ठेवण्यात आलेल्या पुराव्याचा विचार करुन न्यायालयाने असे निष्कर्ष नोंदविले की,
या गुन्ह्यात आरोपीला कोणतीही स्पष्ट भूमिका दिली नाही. तसेच फर्यादीनुसार आरोपी (अर्जदार) हा
संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे. ही टोळी प्रफुल्ल कसबे याने तयार केली होती. मात्र, प्रथमदर्शनी
यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला
जामीन मंजूर करण्यात येत आहे.

आरोपीच्या वतीने अ‍ॅड. ए.आर. अवचट, अ‍ॅड. सिद्धांत मालेगांवकर, अ‍ॅड. कुणाल पगार (Adv. Kunal Pagar) व अ‍ॅड. महेश सदाफळ (Adv. Mahesh Sadafal) यांनी काम पाहिले.

Web Title :  Pune Crime News | Bombay Mumbai High Court grants bail to accused in MCOCA case in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Disaster Management Pune – Mumbai | पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह 7 शहरांसाठी 2500 कोटींची योजना

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पुण्यातील आजचा दर काय? जाणून घ्या