Pune Crime News | अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून शाळेत गेला, मुलं चोरणारा समजून लोकांनी बेदम बदडलं; पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | असं म्हटलं जातं की प्रेम आंधळं असतं, पण प्रेमात बुडालेल्या प्रियकर (Boyfriend) आणि प्रेयसी (Girlfriend) एकमेकांसाठी कोणत्याही अडचणींना सामोरं जाण्यासाठी तयार असतात. एकमेकांना भेटता यावं यासाठी नवनवीन शक्कल लढवत असतात. काही वेळा त्यांना यश येते मात्र, पकडले गेले तर मग… असाच एक प्रकार पुणे शहरात घडला आहे. (Pune Crime News)

अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर तिच्या शाळेत बुरखा घालून गेला. मात्र, त्याचा हा जुगाड त्याच्याच अंगलट आला. परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले. काही वेळातच मुलं चोरणारी टोळी आल्याची अफवा परिसरात पसरली. काही जणांनी या तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील इंदिरानगरमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी विजय अमृत वाघारी या तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय याचे आदर्श इंदिरानगर परिसरातील शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी जात होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती त्यांच्या कुटुंबाला समजली. दोघांच्या कुटुंबियांनी त्यांना समज देऊन भेटण्यास मज्जाव केला. (Pune Crime News)

प्रेयसीला भेटता येत नसल्याने आरोपी विजय हा वेडापिसा झाला होता. प्रेयसीला भेटण्यासाठी तो प्रयत्न करत होता.
मात्र त्याला प्रेयसीला भेटता येत नव्हते. अखेर त्याने शक्कल लढवली. त्याने चक्क बुरखा घालून तिच्या शाळेत
जाण्याचा प्लान केला. मात्र त्याचा हा प्लान फसला. मुलं चरोणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याचा गैरसमज करुन
परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले. त्यानंतर जमलेल्या लोकांनी त्याच्यावर हात साफ करुन घेतला.
त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देऊन आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | सहकारनगरमधील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 54 वी स्थानबध्दतेची कारवाई

Multibagger Stock | ५ वर्षात मालामाल… एक लाख रुपयांचे केले १० लाख, जबरदस्त आहे ‘हा’ शेअर