Pune Crime News | ‘मोक्का’ गुन्ह्यातील आरोपीचा सपासप वार करुन खून, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात सध्या कसबा पेठ पोटनिवडणुकीची (Pune Kasba Peth Bypoll Election) धामधूम सुरु आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्री आणि दिग्गज नेते पुण्यात तळ ठोकून आहेत. मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या बंदोबस्तासाठी पुणे पोलीस (Pune Police) व्यस्त असताना याचा फायदा गुन्हेगारांनी घेतल्याचे (Pune Crime News) पहायला मिळत आहे. मोक्का (MCOCA) Mokka गुन्ह्यातील आरोपीचा पाठलाग करुन त्याच्या डोक्यात सपासप वार करुन निघृण खून (Murder) केल्याची घटना पुण्यातील कर्वेनगर येथे रात्री अकराच्या सुमारास घडली आहे.

पुणे शहरात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीच्या काळात कसबा मतदारसंघात विविध पक्षाचे बडे नेते प्रचारात उतरत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा रस्त्यावर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र असे असताना कसबा मतदारसंघात सहा ठिकाणी घरफोडीचे (Burglary) प्रकार घडले आहेत. तर दत्तवाडी आणि कोथरुडमध्ये सोनसाखळी हिसकावण्याचा घटना घडल्या आहेत. यातच रात्री कर्वेनगर सारख्या रस्त्यावर खुनाचा थरार घडला आहे. (Pune Crime News)

नंदू जाधव (वय-22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यानुसार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मयत नंदू जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर माळवाडी पोलिसांनी (Malwadi Police Station)
मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. मोक्काच्या गुन्ह्यात तो नुकताच जामिनावर (Bail) बाहेर आला होता.
रात्री आकराच्या सुमारास ते कर्वेरस्त्यावरील एका ज्वेलर्सच्या दुकानासमोरुन रस्ता ओलांडत होता.
त्यावेळी दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करुन त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार केले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | brutal murder of mocca criminal on karvenagar road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akola Crime News | धक्कादायक ! सैन्य दलात असलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला; नंतर स्वतःच सासूला फोन करुन दिली माहिती

Police Committed Suicide in Mumbai | मुंबई पोलीस दलात खळबळ! भायखळा कारागृहाबाहेर तैनात पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Pune Accident News | भरधाव वेगातील कार पलटून भीषण अपघात; 3 ठार तर 1 जखमी