Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : बंडगार्डन पोलिस स्टेशन – डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; मालधक्का चौकाजवळील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तरुणाला मारहाण (Beating) करुन त्याच्या डोक्यात दगड घालून खून (Murder In Pune) केला. तसेच त्यांची ओळख पटू नये, म्हणून त्याचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

मालधक्का चौकाच्या स्टेशन रोडच्या (Maldhakka Chowk Pune Railway Station Road) रेल्वे कॉर्टरलगत (Railway Quarter) हा प्रकार घडला असून बुधवारी सकाळी तो उघडकीस आला.

 

याबाबत पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड (Police Constable Dnyaneshwar Gaikwad) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८०/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनवणे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. रेल्वे सरकारी कॉर्टसच्या जवळील पडक्या घराच्या मागे एका ३० ते ३५ वर्षाच्या तरुणाला कोणीतरी मारुन टाकले होते. त्याच्या अंगामध्ये विटकरी रंगाचा शर्ट, लाल रंगाचे बनियन, ट्रॅक पॅट होती. त्यांच्या हनुवटीजवळ मोठी जखम होती. डोक्यात दगड घालून त्याचा खून (Pune Murder News) केला होता.
तसेच ओळख पटू नये, म्हणून तोच दगड चेहर्‍यावर मारून चेहरा विद्रुप केला होता.
त्याची ओळख अद्याप पटलेली नसून सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे (Assistant Police Inspector Sandeep Madhale)
तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Bundagarden Police Station – Youth killed by stone on head;
Incident near Maldhakka Chowk Pune Railway Station Road

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा