Pune Crime News | कल्याणीनगरमध्ये व्यावसायिकाने केला शेकोटी करणाऱ्यांवर गोळीबार; ‘‘भैय्या कहा के हो’’ विचारल्याने रागात केला गोळीबार, तरुणांनी फोडली कार

पुणे : Pune Crime News | शेकोटी करीत बसलेल्या तरुणांनी ‘कहा के हो’ असे विचारल्याने एका व्यावसायिकाने त्यांच्यावर गोळीबार (Firing In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणीनगरमध्ये (Kalyaninagar, Pune) सोमवारी रात्री घडला. या प्रकारानंतर तरुणांनी या व्यावसायिकाची कार फोडली. याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा (Attempted Murder) व चोरी, मारहाण (Beating) असे दोन गुन्हे दाखल केले आहेत. (Pune Crime News)

अमित सत्यपाल सिंग (वय ३१, रा. कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. अमित सिंग यांचा आईस्क्रीमचा ब्रॅंड आहे. त्यांची हडपसरला फॅक्टरी असून त्यांच्या ८ ते ९ फॅन्चायसी दिलेल्या आहेत. ते कल्याणीनगरमधील सिलीकॉन बे येथे रहातात. सोमवारी रात्री ११ वाजता जेवण करुन ते बाहेर फिरायला गेले होते. तेथील रस्त्याच्या डेड एन्डला एका ठिकाणी काही तरुण शेकोटी करुन शेकत बसले होते.

सिंग हेही तेथे गेले. तेव्हा त्यांना या तरुणांनी ‘कहा के हो’, अशी विचारणा केली. त्यानंतर ते परत आले. त्यांनी आपली कार काढून हे तरुण नेमके कोण आहेत, याची माहिती घेण्यासाठी पुन्हा ते तिकडे गेले. त्यावेळी या तरुणांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी कार थांबून ते कार मधून बाहेर आले असताना या तरुणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी स्वरक्षणार्थ हवेत फायर केले. त्यावेळी झालेल्या झटापटीत आपली सोन्याची चैन गहाळ झाली असून या तरुणांनी गाडीच्या काचा फोडल्याचे अमित यांनी तक्रारीत म्हटले आहे. (Pune Crime News)

त्या विरोधात नवनाथ गलांडे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही काही जण शेकोटी करुन शेकत बसलो असताना अमित सिंग तेथे आले.
ते दारुच्या नशेत होते. ‘भय्या कहा के हो’ अशी विचारणा केली. त्याचा त्यांना राग आला. ते निघून गेले.
काही वेळाने ते पुन्हा कार घेऊन आले.
त्यांनी त्यांच्याकडे विचारणा करणार्‍याला बोलावून घेतले व त्याच्यावर पिस्तुल रोखले.
तेव्हा घाबरुन त्यांनी त्यांचा हाथ धरला. त्यामुळे पिस्तुलातून वर हवेत गोळी झाडली गेली.
त्यानंतर ते गाडी सोडून पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav), वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम
(PI Balkrishna Kadam) व अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले.
त्यांनी चौकशी करुन दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title :- Pune Crime News | Businessman fires at firecrackers in Kalyaninagar; After asking “Bhayya kaha ke ho”, fired in anger, the youth smashed the car

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब जिवंत असते तर संजय राऊतांना…,’ शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची संतप्त टीका

Amol Mitkari | राज्यपालांचा राजीनामा म्हणजे, उशीरा सुचलेले शहाणपण; अमोल मिटकरींची खोचक टीका