Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणीखोरी करणार्‍यांविरोधात मोहीम; एकाच दिवसात विमानतळ पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल, दोन महिन्यांनी घेतली दखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नगर रोड (Nagar Road, Pune) परिसरातील व्यावसायिकांकडून माथाडीच्या नावाखाली खंडणी (Extortion) उकळणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेशकुमार (CP Retesh Kumaarr) यांनी दिल्यानंतर आता पोलीस सर्तक झाले असून एकाच दिवसात विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Pune Crime News)

 

याप्रकरणी या ३६ वर्षाच्या व्यावसायिकाने विमानतळ पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रवी ससाणे व त्यांच्या तीन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार फिनिक्स मॉल येथे १९ ऑक्टोबर २०२२ ते २३ जानेवारी २०२३ दरम्यान घडला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची फर्म असून त्यांना एका कंपनीचे फ्लोअरींगचे फरशी बसविण्याचे काम मिळाले आहे. त्यासाठी कोची येथून फरशा घेऊन ट्रक १९ ऑक्टोबर २०२२ रोजी आला होता. त्यावेळी रवी ससाणे व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी ट्रकमधील माल खाली करण्यास हरकत घेतली. रवी ससाणे फिर्यादीला म्हणाला, मी येथील स्थानिक आाहे. ट्रकमधील फरशी आम्हीच खाली करणार, त्यासाठी तुला ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे बोलला. त्यावर त्यांनी तुम्ही माथाडी बोर्डाचे नोंदणीकृत कामगार आहात का, असे विचारले. तेव्हा ससाणे याने माझी तू माहिती काढून बघ, मी तडीपार होतो, तुला या ठिकाणी गाड्या लोडिंग अनलोडिंग करायचे असेल तर मला ५ लाख रुपये देऊन टाक. नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

 

त्यावर फिर्यादी यांनी त्यांच्याजवळ असलेले ७६ हजार रुपये दिले. त्यानंतर ते फरशा खाली न करता तसेच निघून गेले. दुसर्‍या दिवशी त्याचे साथीदार येऊन फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने १ लाख २४ हजार रुपये घेऊन गेले. फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात २९ नोव्हेबर २०२२ रोजी तक्रार अर्ज दिला होता. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. (Pune Crime News)

त्यानंतर २३ जानेवारी २०२३ रोजी त्यांचा ट्रक ससाणे याच्या लोकांनी पुन्हा अडविला. तुम्ही रवि मामाला ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत, असे म्हणून ट्रक खाली करण्यास हरकत घेतली. तेव्हा फिर्यादी यांनी घरातून ११२ क्रमांकावर फोन केला. पोलीस आल्याचे पाहून रवी सासणेची माणसे निघून गेली. त्यानंतर आता खंडणी विरोधी पथकाने या घटनेची दखल घेतली असून गुन्हा दाखल केला आहे.

 

अशाच प्रकारे ट्रकमधून माल घेऊन आलेल्यांना अडवून माथाडी संघटनेला ५०० रुपये एंट्री द्यावी लागेल, अशी मागणी करणार्‍या धोंडिबा विठ्ठल राखपसरे (रा. राखपसरे वस्ती), राहुल भिमराव त्रिभुवन (रा. संजय पार्क,विमाननगर) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लोहगाव येथील सरस्वती एंटरप्रायजेस येथे २४ जानेवारी रोजी झाला होता. एका बिल्डिंग सप्लायर व्यावसायिकाने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या कंपनीचा चालक व इतर तीन कामगार हे डिस्ट्रीब्युटरकडे माल पोहचविण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचा ट्रक अडविला. माल खाली करण्यासाठी माथाडी संघटनेला ५०० रुपये एंट्री द्यावी लागेल, नाही तर तुम्हाला बघून घेईल, अशी धमकी दिली होती. (Pune Crime News)

अंडाभुर्जीची हातगाडी लावण्यासाठी दर महा १० हजार रुपयांची हप्त्यांची
मागणी करणार्‍या अशोक चव्हाण (वय ४५, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांचे पती म्हाडा कॉलनीच्या बसस्टॉपजवळ अंडाभुर्जीची हातगाडी लावून व्यवसाय करतात.
अशोक चव्हाण हा ३१ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या गाडीवर आला.
फिर्यादी यांना अंडाभुर्जीची गाडी चालू ठेवण्यासाठी दरमहा १० हजार रुपयांची हप्त्याची मागणी केली.
हप्ता न दिल्यामुळे त्याने फिर्यादींना अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन
हाताने चापट मारुन पतीला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | campaign against extortionists in the name of Mathadi;
In a single day, 3 crimes were filed in the viman nagar police station, two months later they took notice

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा