Pune Crime News | पोलीस उपनिरीक्षकाच्या वर्दीला हात घालणार्‍या कारचालकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गर्दीच्या वेळी रस्तात कार पार्क करुन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी वाद घालून उपनिरीक्षकाच्या वर्दीला हात घालणार्‍या कारचालकाला विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

 

अभिनंदन सखाराम गायकवाड (वय ३७, रा. कुुमार प्रायम व्हेरा, साईनाथनगर, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे (PSI Ravindra Dhavre) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५/२३) दिली आहे. ही घटना विमाननगर येथील खालसा डेअरीसमोरील रोडवर शनिवारी रात्री पावणे आठ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे (Sr PI Vilas Sonde) हे इतरांच्या मदतीने वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी अभिनंदन गायकवाड त्याची पांढर्‍या रंगाची कार रस्त्यामध्ये पार्क करुन थांबला होता. त्याला पवार यांनी कार काढून घेण्यास सांगितले. तेव्हा तो वाद घालू लागला. हे पाहून फिर्यादी हे त्याला समजावून वाद न करता गाडी काढून घेण्याबाबत सांगत होते. तेव्हा गायकवाड याने फिर्यादींना तुला माझीच गाडी दिसली का इतर गाड्या दिसत नाहीत का असे बोलल्यानंतर फिर्यादीने ट्रॅफिक जाम आहे़ गाडी काढ्न घ्या, असे सांगितले. त्यावर आरोपीने मी गाडी काढणार नाही.
काय करायचे ते करा मी तुमच्याकडे बघून घेतो, असे म्हणून फिर्यादीसोबत झटापटी करुन सरकारी वर्दीची कॉलर ओढली.
पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन गायकवाड याला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक वाकडे (PSI Wakde) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Car driver arrested for touching police sub-inspector’s uniform

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक