Pune Crime News | व्हॉर्न वाजविल्याने कारचालकाने केली पीएमपी बसचालकाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | रस्ता आपल्या बापाचा असल्यासारखे कोठेही गाडी उभी करणे, छोट्या छोट्या बाबीतून हामरी तुमरीवर येण्याचे प्रसंग वाढू लागले आहेत. बसस्टॉपसमोर (PMP Bus Stop) बसपुढे कार थांबविल्याने बसचालकाने व्हॉर्न वाजविला, त्याचा राग येऊन एका २० वर्षाच्या कारचालकाने बसमध्ये (PMP Bus) शिरुन चालकाला मारहाण (Beating) केली. (Pune Crime News)

याबाबत बसचालक तुषार खंडेराव डोंबाळे (वय ३५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल लोंढे (वय २०, रा. संकेत विहार, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार डोंबाळे हे पीएमपीच्या हडपसर आगारात (PMP’s Hadapsar Agar)
चालक म्हणून काम करतात. बुधवारी सायंकाळी ते बस घेऊन हडपसरहून निघाले. संकेत विहार येथील बसस्टॉपवर त्यांनी प्रवाशांना चढण्या -उतरण्यासाठी बस थांबविली. तेवढ्यात एक नंबर तुटलेली झेन कार बसच्या पुढे येऊन उभी राहिली. त्यामुळे डोंबाळे यांना बस पुढे काढता येईना, त्यामुळे त्यांनी व्हॉर्न वाजविला. तेव्हा कारमधून एक मुलगा बाहेर आला. त्याने बसचालकाला शिवीगाळ करुन बस मागे घे असे म्हणाला. तेव्हा चालकाने बस मागे घेतली. तो मुलगा बसमध्ये चढला. (Pune Crime News)

त्याने बसचालक डोंबाळे यांना हाताच्या चापटीने मारहाण करण्यास सुरुवात केली. जोराजोरात शिवीगाळ करु लागला.
नंतर तो बसमधून उतरला. तेथे ज्याचे आई वडिलही आले. ते त्याला घेऊन गेले.
याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी आले.
बसचालकांनी उपचार घेतल्यानंतर तक्रार दिली असून पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल
अमोल लोंढे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | ‘वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा निर्णय, पक्षात फूट पडलेली नाही’, शरद पवारांच्या नव्या गुगलीने राजकीय चर्चांना उधाण (व्हिडीओ)

Post Office | पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटचे आता नवीन नियम, काय-काय बदलले, जाणून घ्या

25 August Rashifal : मेष आणि मिथुनसह या तीन राशीवाल्यांसाठी दिवस आहे खास, वाचा दैनिक भविष्य