Pune Crime News | व्याजाने दिलेल्या पैशांची ‘पठाणी’ वसुली करणार्‍या तिघा सावकारांविरूध्द गुन्हा; रविंद्र कांबळेला अटक तर आकाश कासट व जमीर कदम वर FIR

पुणे : Pune Crime News | व्यावसायासाठी व्याजाने पैसे घेऊन ते परत केले असताना अधिक पैशांची (पठाणी वसुली) मागणी करुन वडिलांना जीवे मारण्याची तसेच दुकान जाळून टाकण्याची धमकी देणार्‍या बेकायदा सावकारी (Illegal Moneylenders) करणार्‍याला तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी रवींद्र कांबळे Ravindra Kamble (रा. पर्वती) याला अटक केली आहे. आकाश कासट (Akash Kasat) व जमीर कदम (Jamir Kadam) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी मार्केटयार्ड (Market Yard, Pune) येथील एका २८ वर्षाच्या व्यावसायिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४१/२३) दिली आहे. हा प्रकार जुलै ते डिसेबर २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे जोगेश्वरी मंदिर परिसरात व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी फिर्यादी यांनी रवींद्र कांबळे याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याचे १ लाख ९० हजार रुपये परत केले. तरीही आरोपीने फिर्यादींचे वडिलांना जीवे मारण्याची व दुकान जाळून टाकण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या वडिलांकडून ३ लाख रुपये घेऊन गेले व आणखी ५ लाख व्याज फिर्यादीस मागत आहे.

फिर्यादी यांनी आकाश कासट याच्याकडून १ लाख रुपये घेऊन त्याचे दीड लाख रुपये व्याजासकट परत केले होते.
तरीही तो फिर्यादीचे वडिलांना अजून ५० हजार रुपयांची मागणी करत आहे.
तसेच जमीर कदम याच्याकडून फिर्यादी याने ४ लाख ४९ हजार रुपये २० टक्के व्याजाने घेतले होते.
त्याचे ७ लाख २२ हजार रुपये परत दिले. तरीही कदम हा आणखी ८ लाख रुपये मागत आहे.
नाही दिले तर फिर्यादी व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक बरुरे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Case against three moneylenders for ‘pathani’ recovery of money paid with interest; Ravindra Kamble arrested and FIR against Akash Kasat and Jameer Kadam