पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुर्ववैमन्याशातून टोळक्याने दोन भावांंना उलट्या कोयत्याने मारहाण करीत धुडगूस घातला. रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करत एका घराची काच फोडली. ही घटना शुक्रवारी दुपारी पिसोळीत पद्मावती मंदीराजवळ घडली. याप्रकरणी नवनाथ मासाळ (वय 37, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ आणि पुष्कर सख्खे भाऊ आहेत. काही दिवसांपुर्वी पुष्कर आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. त्याचा राग मनामध्ये 10 जणांच्या टोळक्याने पुष्करच्या मोटारीचा पाठलाग करुन उलट्या कोयत्याने मारहाण केली. त्यावेळी नवनाथ भांडण सोडविण्यासाठी आला असता, टोळक्यानी त्यांनाही मारहाण करीत जखमी केले. तसेच परिसरात दहशत पसरविण्याच्या हेतूने रस्त्यावरील वाहनांच्या काचा फोडल्या. त्यानंतर टोळक्याने नवनाथ यांचे गोदाम आणि शेजारील खोलीच्या काचा फोडून नुकसान केले.
रिचार्जच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक
पुणे : मोबाईल सीमकार्ड रिचार्जच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची 99 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आशुतोष सिंग नावाच्या व्यक्तीविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना जिओ सिमकार्डला रिचार्ज करायचे होते. त्यांनी प्रयत्न केला. परंतु, ते होत नव्हते. त्यामुळे महिलेने ग्राहक सेवा अधिकार्याशी संपर्क साधला. त्यानंतर भामट्याने जिओ कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करीत महिलेकडून बँकेसह डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर त्यांना मोबाईलवर आलेला ओटीपी विचारुन महिलेच्या बँक खात्यातून ऑनलाईनरित्या 99 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली.
सख्ख्या बहिणांचा 30 लाखांवर ‘डल्ला’
पुणे : घरमालकीण बाहेर गेल्यानंतर अलिशान बंगल्यातून तब्बल 30 लाखांची रोकड चोरणार्या दोन सख्ख्या मोलकरीण बहिणींना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. एरंडवणा परिसरात ही घटना घडली आहे. संजना वारंगे आणि सुवर्णा सावंत (दोघेही रा. एसएनडीटी परिसर, मूळ-कोकण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वृषाली चालुक्य (वय 32, रा. एरंडवणा) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्या एरंवडणा परिसरात राहतात. सोलापूरात त्यांच्या कुटूंबियाचा उत्खनन आणि शेतीचा मोठा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे घरकामासाठी या दोघी होत्या. काही महिन्यांपुर्वी वृषालीने घरखर्चासाठी वडिलांकडून 30 लाखांची रोकड मागवून घेतली होती. वडिलांनी पाठविलेली रोकड त्यांनी बेडरुममधील कपाटात ठेवली होती. त्यानंतर 8 ते 29 नोव्हेंबरदरम्यान वृषाली कामानिमित्त बाहेरगावी गेल्या असता, संजना आणि सुवर्णाने कपाटातील 30 लाखांची रोकड घेउन पळ काढला. चोरीचा संशय मोलकरीण महिलांवर आल्यानंतर पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी 30 लाखांची चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सी. एम. सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर येरवड्यातील एका खासगी कंपनीलगत असलेल्या इमारतीत राहण्यात आहेत. जेवण झाल्यानंतर ते शतपावली करत होते. लघुशंका करण्यासाठी सार्वजनिक शौचालयात गेले असता, पाठीमागून आलेल्या एकाने त्यांना जीवे मारण्याची धमकी देउन गळ्यातील सोन्याचा गोफ आणि अंगठी असा मिळून 96 हजारांचा ऐवज चोरुन पळ काढला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे अधिक तपास करीत आहेत.
भरदिवसा वारजत घरफोडी
पुणे : शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून वारज्यात भरदिवसा चोरट्यांनी बंद फ्लॅटवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. येथून चोरट्यांनी 1 लाख 78 हजारांचा ऐवज चोरुन नेला.
याप्रकरणी महेश पाठक (वय 38, रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येथील शिवशक्ती चौकातील दोडके प्लाझात राहतात. दोन दिवसांपुर्वी ते कुटूंबियासह बाहेर गेले होते.
त्यावेळी सकाळी दहा ते रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील साडेतीन हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने मिळून 1 लाख 78 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी वारजे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Visit : Policenama.com
- विविध आजारांना दूर ठेवतो ‘हा’ चहा, नियमित घेतल्याने होतील ‘हे’ १० फायदे
- ‘डेंग्यू’च्या रुग्णांना ‘या’ ५ गोष्टींच्या सेवनाने मिळेल आराम, जाणून घ्या
- हृदयविकार आणि ‘कार्डिअॅक अॅरेस्ट’मध्ये ‘हा’ फरक, जाणून घ्या ६ कारणे
- महिलांनो, अकाली हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढतोय! ‘ही’ आहेत ४ कारणे
- ‘या’ ६ सवयी लावून घेतल्या तर दातांचे आरोग्य राहील चांगले, जाणून घ्या
- रोज अंडे खाण्याचे ‘हे’ आहेत ४ फायदे, जाणून घ्या
- महिलांनो, मैत्रिणाचा ‘डाएट फॉलो’ करण्यापूर्वी ‘हे’ जरूर वाचा, ‘ही’ आहेत ५ कारणे