Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकांना धमकावून 29 लाखांची खंडणी उकळणार्‍या चेतन बालवडकरसह 4 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | बालेवाडी (Balewadi) येथील बांधकाम चालू असलेल्या इमारतीचे बांधकाम बंद पाडण्याची व सोशल मीडियावर बदनामी (Defamation On Social Media) करण्याची भिती दाखवून २९ लाख रुपयांची खंडणी वसुल (Extortion Case) करणार्‍या व आणखी २४ लाखांची खंडणी मागणार्‍या चेतन बालवडकरसह (Chetan Balwadkar) चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

चेतन सुभाष बालवडकर Chetan Subhas Balwadkar (वय ३५), रोहन सुभाष बालवडकर Rohan Subhas Balwadkar (वय ३३, दोघे रा. लक्ष्मीनगर, बालेवाडी), सागर वसंत बालवडकर Sagar Vasant Balwadkar (वय ३५, रा. गारमाळ, धायरी) आणि आदित्य दत्तात्रय हगवणे Aditya Dattatraya Hagwane (वय ३३, रा. कोंढवा बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

याप्रकरणी कर्वेनगरमध्ये (Karve Nagar, Pune) राहणार्‍या एका व्यावसायिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५/२३) दिली आहे. हा प्रकार ७ एप्रिल २०२२ पासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल आणि आरोपी यांच्यात एका जागेवरुन यापूर्वी व्यवहार झाला होता. तो व्यवहार पूर्ण झाला. त्यानंतर फिर्यादी यांनी बालेवाडी येथे नवीन इमारतीचे काम चालू केले. तेव्हा आरोपी हे वेळोवेळी साईटवर येऊन त्यांना काम बंद पाडण्याची धमकी देत होते. तसेच त्यांची साईट बोगस आहे. त्यांचा सर्व्हे नंबर चुकीचा आहे, असे सोशल मीडियावर टाकून बदनामी करत होते.

साईट बंद करण्याची धमकी देऊन त्यांनी फिर्यादी यांच्याकडे खंडणी मागत होते.
त्यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी २६ लाख ७५ हजार रुपये रोख तसेच पत्नी व सुपरवायझरच्या नावावरुन चेक,
आरटीजीएसद्वारे २ लाख ५० हजार रुपये खंडणी उकळली.
बालेवाडी येथील गृहप्रकल्पामध्ये अगोदर वन बीएचके फ्लॅटची मागणी करत होते.
फिर्यादी घाबरलेले आहेत, हे लक्षात आल्यावर त्यांनी दोन थ्री बीएचके फ्लॅटची मागणी केली.
तसेच आणखी २४ लाख रुपयांची मागणी करत होते.
शेवटी या त्रासाला कंटाळून त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे (Anti Extortion Cell Pune) तक्रार केली.
त्यांच्या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr PI Balaji Pandhare) यांनी चौकशी केली.
त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक चाळके (PSI Chalke) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Case registered against 4 persons including Chetan Balwadkar who extorted extortion of 29 lakhs by threatening builders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mhada Lottery 2023 | आता म्हाडाचे घर घेणं झालं सोप्प! २१ नाही तर लागणार फक्त एवढीचं कागदपत्रे…

Hypersomnia Symptoms | ८ तास झोपल्यानंतर सुद्धा दिवसा का येते झोप, जांभईपासून अशी होईल सुटका