Pune Crime News | भाजपचे नेते गणेश बिडकरांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | मतदानासाठी पैसे वाटप करणार्‍यांना रोखण्याचा प्रयत्न करीत असलेल्यांना शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केल्या प्रकरणी भाजपचे नेते गणेश बिडकर (BJP Leader Ganesh Bidkar) यांच्यासह चौघांवर समर्थ पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी फैयाज कासाम शेख (वय ३८, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११६/२३) दिली आहे. त्यानुसार गणेश बिडकर, मयुर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील आएशा कॉम्प्लेक्स येथे रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे युवक काँग्रेसचे पुणे कॉन्टोन्मेंट मतदार संघाचे माजी अध्यक्ष असून ते मालधक्का चौकात त्याचे मित्र याकुब बशीर शेख यांच्यासह फिरत होते.
त्यावेळी आएशा कॉम्प्लेक्समध्ये भाजपाचे कार्यकर्ते हे मतदारांना पैशांचे वाटप करीत आहेत,
अशी माहिती त्यांना मिळाली. त्याची खात्री करण्यासाठी ते तेथे गेले. त्यावेळी गणेश बिडकर, मयुर चव्हाण,
नईम शेख, बाला शेख हे उभे असल्याचे दिसले.
त्यांच्या हातामध्ये केशरी रंगाची पिशवी व मतदारांचे स्लिपा दिसल्या व या पिशव्यामध्ये पैसे असून ते मतदारांना वाटत असल्याबाबत त्यांनी विचारणा केली.
तेव्हा फिर्यादी व त्यांचा मित्र याकुब शेख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धक्का देऊन तेथून
ते पळून गेले. या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.
त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Case registered against BJP leader Ganesh Bidkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अक्षय कुमारने पान मसाल्याचा जाहिरातीत काम करण्याबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाला – ‘ती माझी सर्वात मोठी चूक….’

Bhandara Crime News | भंडाऱ्यामध्ये रोड रोमिओने काढली तरुणीची छेड; लोकांकडून बेदम मारहाण

Beed Crime News | सततची नापिकी, सावकाराचे डोक्यावर कर्ज या आर्थिक विवंचनेतून बीडच्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल