पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात भरदिवसा कोयते उगारून दहशत माजवण्याचा घटना घडत आहेत. पुण्यात कोयता गँगने (Pune Koyta Gang) धुमाकूळ घातला आहे. कोयता गँगची दहशत कमी करुन गुन्हेगारांवर (Criminal) कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police News) अनोखी योजना सुरु केली आहे. ‘आरोपींना पकडा अन् बक्षीस मिळवा’, अशी ही योजना आहे. (Pune Crime News)
कोयता गँगच्या दहशतीमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न ऐरणीवर आला. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने अशा मुलांवर कारवाई करण्यासाठी बाल गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यामधील (Juvenile Crime Prevention Act) तरतुदींचा वापर केला जात आहे. गुन्हेगारी टोळीमधील फरार तसेच त्यांच्या साथीदारांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा ही योजना जाहीर केली आहे. (Pune Crime News)
असे असेल बक्षिसाचे स्वरूप
– बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडले तर 10 हजार रुपये.
– शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ४, २५ नुसार कारवाई केल्यास 3 हजार रुपयांचे बक्षीस
– फरार आरोपीला पकडल्यास 10 हजार रुपयांचे बक्षीस
– गंभीर गु्न्ह्यातील पसार आरोपीला पकडल्यास 5 हजार रुपयांचे बक्षीस
– महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (MCOCA) Mokka) कारवाई केल्यानंतर पसार झालेल्या गुंडाला पकडल्यास 5 हजार रुपयांचे बक्षीस
– विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला पकडल्यास 5 हजार रुपयांचे बक्षीस
– महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई केल्यास 2 आणि 1 हजार रुपयांचे बक्षीस
पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी कारवाई केल्यास वरील प्रकारची बक्षीसाची रक्कम दिली जाणार आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) आणि रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma) यांनी ही योजना सुरू केली आहे.
Web Title :- Pune Crime News | ‘Catch the accused and get the reward’, a unique plan of Pune Police due to the fear of Koyta Gang
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MSBSHSE Pune | दहावी-बारावी परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेनंतर परिक्षा कक्षात प्रवेश नाही