Pune Crime News | मोक्कासह इतर गुन्ह्यातील फरार आरोपीला चंदननगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मोक्का (MCOCA) Mokka आणि इतर चार गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. आरोपीवर इतर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दखल असून पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) चौधरी वस्तीकडे जाणाऱ्या रोडवर शनिवारी (दि.28) केली. अमीनमुस्तफा ढवळगी उर्फ अश्पाक (वय-19 रा. लक्ष्मी नगर, येरवडा) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

चंदननगर पोलीस ठाण्यातील (Chandannagar Police Station) तपास पथक हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना सचिन रणदिवे (Sachin Ranadive) व नामदेव गडदरे (Namdev Gadare) यांना माहिती मिळाली की, मोक्का गुन्ह्यातील आणि इतर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी चौधरी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबला आहे. पोलिसांनी सापळा रचून दुर्गा माता मंदिरासमोरुन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता विश्रांतवाडी (Vishrantwadi Police Station), कोरेगाव पार्क (Koregaon Park Police Station), विमानतळ (Viman Nagar Police Station), दत्तवाडी (Dattawadi Police Station), कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) दाखल गुन्ह्यात फरार असल्याची माहिती मिळाली. आरोपीला पुढील कारवाईसाठी विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime News)

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat),
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी राजेंद्र लांडगे (Rajendra Landge),
पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar),
पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे (PSI Arvind Kumre) , पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ,
सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड,
शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर, विकास कदम यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Chandannagar police arrest absconding accused in Mokka and other crimes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा