Pune Crime News | चंदननगर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केला अत्याचार

पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीला प्रेमात गुंतवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्याचे व्हिडिओ तयार करुन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार (Pune Minor Girl Rape Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी खराडी येथील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२९/२३) दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अरबाज सिकंदर शेख Arbaaz Sikandar Shaikh (वय २५, रा. ओगलेवाडी, तारकड, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२२ ते २३ मार्च २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरबाज शेख हा २०२२ मध्ये फिर्यादी यांच्या शेजारी रहात होता.
त्यावेळी त्याने फिर्यादी यांच्या १७ वर्षाच्या मुलीला फुस लावून तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले.
तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशाी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
तिचे अश्लिल फोटो व व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढले.
ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर अत्याचार केला.
पोलिसांनी पोक्सो खाली गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Chandannagar: Threatened to spread obscene photos of a minor girl by luring her into marriage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Udayanraje Bhosale | ‘तर मिशीच काय… भुवया पण काढून टाकेन आणि…’, उदयनराजेंचे चॅलेंज शिवेंद्रराजे स्वीकारणार का? (व्हिडिओ)

Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | पुण्याच्या विकासाचे आव्हान राज्य सरकारने स्वीकारले; मोठ्या प्रकल्पांना गती मिळावी – आमदार सिद्धार्थ शिरोळे