Pune Crime News |  पुणे क्राईम न्युज: चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन – सायबर व आर्थिक गुन्हे शाखा पुणे- एपीएस वेल्थ व्हेंचर्सचा संचालक अविनाश राठोड आणि विशाखा राठोडवर 16 कोटींच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News |  गुंतवणुकीवर (Investment) जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून 16 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एपीएस वेल्थ व्हेंन्चर्सच्या (APS Wealth Ventures LLP) संचालकांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा 2018 ते 20 एप्रिल 2023 या कालावधीत घडला आहे. याबाबत वाकड येथील एका डॉक्टरने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

 

डॉ. जयदीप शंकरराव जाधव Dr. Jaideep Shankarao Jadhav (वय-50 रा. कस्पटे वस्ती रोड, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एपीएस वेल्थ व्हेंचर्श एलएलपी या कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड (Director Avinash Arjun Rathod), त्याची पत्नी विशाखा अविनाश राठोड  Visakha Avinash Rathod (रा.आनंदबन सोसायटी, रावेत) व इतर साथिदारांवर आयपीसी 420, 406, 409, 34 सह एमपीआयडी कायद्यांतर्गत (MPID Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना एपीएस वेल्थ व्हेंन्चर्स एलएलपी या कंपनी गुंतवणुक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्य़ादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवला. फिर्य़ादी यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून 1 कोटी 20 लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या स्किममध्ये गुंतवले. गुंतवणूक केलल्या रक्कमेवर जादा परताव्याचे आमिष दाखवून तसेच करार करुन दिला.

आरोपींनी फिर्यादी यांनी गुंतवलेल्या पैशांवर परतावा न देता आर्थिक फसवणूक केली.
फिर्यादी यांनी गुंतवलेल्या रक्कमेपैकी 86 लाख 37 हजार 500 रुपये व इतर
अनेक गुंतवणूकदारांचे 15 कोटी 45 लाख 24 हजार अशी एकूण 16 कोटी 31 लाख 61 हजार 500 रुपयांची फसवणूक केली.
आरोपींनी कराराचा भंग करुन गुंतवणुकीची रक्कम व त्यावरील परतावा न देता पैशांचा अपहार करुन अनेकांची फसवणूक केली.
तसेच अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली असल्याचा अंदाज वर्तवला जात असून याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असू शकते.
आरोपींनी कोट्यावधी रुपायांची फसवणूक केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 

 

Web Title :- Pune Crime News | Chatu: Shringi Police Station – Cyber and Financial Crimes Branch Pune – Director of APS Wealth Ventures Avinash Rathod and Vishakha Rathod booked in 16 crore fraud case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political News | ‘काहीही झालं तरी महाराष्ट्रात भूकंप होणारच’, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा