Pune Crime News | चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पती-पत्नीस बेदम मारहाण करणार्‍या महिला वकिलावर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | कारला साईड न दिल्याने झालेल्या वादात पती-पत्नीस बेदम मारहाण करणार्‍या एका महिला वकिलावर (Women Advocate) पोलिसांनी गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार सेनापती बापट रोडवरील (Senapati Bapat Road) पत्रकारनगर चौकात १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला होता. (Pune Crime News)

याबाबत 45 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५५/२३) दिली आहे. त्यानुसार महिला वकिलावर (Woman Lawyer) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती व फिर्यादी या कारमधून जात असताना दुचाकीवरुन आलेल्या
महिला वकिलाला साईड दिली नाही. म्हणून शिवीगाळ करुन पुढे निघून गेली.
पुढे सिग्नल असल्याने फिर्यादीने खाली उतरुन आरोपीस तू माझे पतीस शिवीगाळ का केली,
असे विचारले असता आरोपीने फिर्यादीसह शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन तिच्या जवळील शस्त्राने
फिर्यादीचे गालावर वार करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चैन हिसकविण्याचा प्रयत्न केला.
तसेच फिर्यादीचे पती हे मध्यस्थी करण्यास आले असताना त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली आहे.
याबाबत फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सीआरपीसी १५६/३ नुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर (PSI Gadekar) तपास करीत आहेत. (Pune Crime News)

Web Title :   Pune Crime News | Chaturshringi Police Station – A case has been registered against a woman lawyer who brutally beat up her husband and wife

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | दुर्दैवी ! सेवानिवृत्त झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच पुणे पोलीस दलातील हवालदाराचा मृत्यू

Pune School News | पुण्यातील नामवंत शाळेने फी भरली नाही म्हणून 150 विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; पालक संतप्त

Sharad Pawar Meet CM Eknath Shinde | शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं भेटीचं कारण