Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – चार्टड अकाऊंटंटनेच चेकवर बनावट सह्या करुन 35 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | आयकराची कामे पाहणार्‍या चार्टर्ड अकाऊंटंटनेच (Chartered Accountant In Pune) गहाळ झालेल्या चेकवर बनावट सह्या करुन ३४ लाख ६५ हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत मुकुंदनगर (Mukund Nagar Pune) येथील एका ४६ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नरेंद्र बिजलवान CA Narendra Bijlwan (रा. वसई ईस्ट) याच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार बाणेर रोड येथील कार्यालयात १३ फेबुवारी ते ४ मार्च २०२१ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
फिर्यादी यांच्या पतीचे आयकर विषयक कामे आरोपी नरेंद्र बिजलवान हा पाहतो.
फिर्यादी यांच्या पतीचे निधन झाले आहे. फिर्यादी यांचे दोन चेक हरवले होते. तसे त्यांनी बँकेला कळविले होते.
या दोन वेगवेगळ्या बँकेचे चेकवर रक्कमा टाकून नरेंद्र बिजलवान याने फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करुन
३४ लाख ६५ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक (Fraud Case) केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे (API kendre) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Chaturshringi Police Station Chartered accountant CA Narendra Bijlwan cheated Rs 35 lakh by forging cheque

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Weather Update | मॉन्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात 16 जूनपर्यंत पावसाची शक्यता

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – अपघातामुळे बनावट नंबर प्लेट लावून फिरणारा कारचालक सापडला