Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – जादा व्याज देण्याच्या अमिषाने सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ज्येष्ठ नागरिकांनी कंपनीत गुंतवणुक (Investment) केल्यास जादा व्याज येण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकासह (Retired Police Inspector) अनेकांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) रेहान एंटरप्रायजेस कंपनीचे (Rehan Enterprises Company) संस्थापक महादेव जाधव (Mahadev Jadhav) व इतर संचालकांविरुद्ध गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत आनंदनगर येथील ६१ वर्षांचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांनी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२५/२३) दिली आहे. हा प्रकार बाणेर (Baner) येथील तीर्थ टेन्को स्पेसमध्ये ५ एप्रिल २०२२ पासून आजपर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव जाधव व संचालकांनी रेहान एंटरप्रायजेस नावाची कंपनी स्थापन केली.
फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगा तसेच इतर बर्‍याच मध्यमवर्गीय, गरीब व ज्येष्ठ नागरिक यांना त्यांच्या कंपनीत गुंतवणुक केल्यास
जास्त व्याज देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार त्यांनी ७ लाख ५६ हजार रुपयांची गुंतवणुक केली.
मात्र, त्या गुंतवणूकीवर कोणतेही व्याज न देता, गुंतवलेली रक्कम परत न करता फसवणूक (Fraud Case) केली.
फिर्यादी यांच्याप्रमाणे इतरांचीही अशीच फसवणूक केली असून आर्थिक गुन्हे शाखेचे (Economic Offences Wing (EoW) Pune)
सहायक पोलीस निरीक्षक तोडकरी (API Todkari) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Chaturshringi Police Station – Retired Police Inspector cheated by paying excessive interest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा